शहरं
Join us  
Trending Stories
1
"३१ हजार कोटींच्या पॅकेजचे समर्थन करायला तयार, पण माझी एक अट", उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मोठी मागणी
2
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
बँकांत तब्बल १७६ कोटी रुपये पडून, तुमचे तर नाहीत ना? मालकच मिळेनात, १० वर्षांपासून ग्राहक फिरकले नाहीत, पैसे नेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
4
बिहारमध्ये काँग्रेसचं टेन्शन वाढलं...! 57 पेक्षा जास्त जागा द्यायला लालूंचा नकार; आता काय होणार?
5
'मिस्टर मोदी, तुम्ही दुबळे आहात...', अफगाणी परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
6
FD मध्ये गुंतवणूक करायचीय? हे आहेत 10 बेस्ट बँक ऑप्शन्स, येथे मिळतोय जवळपास 9% परतावा; जाणून घ्या सविस्तर
7
Diwali 2025: रांगोळीत दडलंय लक्ष्मी कृपेचं गूढ, एकदा समजून घ्याल तर स्टिकर वापरणार नाही!
8
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
9
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
10
Shubman Gill Record : टीम इंडियातील 'प्रिन्स'ची कमाल; क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'चा महारेकॉर्ड मोडला
11
"लोकसभा निवडणुकीत भुमरेंनी माझ्या विरोधात १२० कोटी वाटले, शेतकऱ्यांना दारू पाजून...!" खैरेंचा गंभीर आरोप
12
जे पेरले तेच उगवले! पाकिस्तानी लष्कराचा लाड त्यांच्याच अंगलट आला; 'तहरीक-ए-लब्बैक' संघटनेने डोकेदुखी वाढवली
13
सचिन तेंडुलकरची साद, माणिकराव कोकाटेंचा तत्काळ प्रतिसाद; खेळाडूंसाठी घेतला मोठा निर्णय
14
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
15
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
16
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
17
“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
18
अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक; बनावट बँक हमी प्रकरणात ED ची मोठी कारवाई
19
ग्रामीण भारताचा विकास करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि; त्यांच्या कार्याचा आढावा!
20
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण... 

गुडन्यूज! ठाणे-दिवा दरम्यान रेल्वेच्या 5व्या मार्गिकेचे काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 15:03 IST

6 व्या मार्गिकेसाठी 72 तासांचा मेगाब्लॉक; खासदार डॉ. शिंदे यांची माहिती

डोंबिवली: मध्य रेल्वेच्या महत्वकांक्षी प्रकल्पांपैकी एक असणाऱ्या ठाणे - दिवा  दरम्यानच्या 5 व्या - 6व्या मार्गपैकी 5 व्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. काल 23 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकदरम्यान हे काम पूर्ण झाले असून 6 व्या मार्गिकेचे कामही काही दिवसांत पूर्ण होणार असल्याची माहिती कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण दरम्यानच्या उपनगरी तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीच्या दृष्टीने ही 5 वी - 6 वी मार्गिक अत्यंत महत्वाची आहे. गेल्या 14 वर्षांपासून त्यांचे काम सुरू असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे त्याला मोठी गती प्राप्त झाली आहे. परिणामी अवघ्या काही महिन्यातच हे काम अंतिम टप्प्यात आले असून काल 5 व्या मार्गिकेचे काम पूर्णत्वास गेले. तसेच पूर्ण झालेल्या या मार्गाची रेल्वे प्रशासनाने रिकामी लोकल चालवून चाचणीही केली. तर 6व्या मार्गिकेसाठी येत्या 4 ते  6 फेब्रुवारी दरम्यानच्या 72 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आल्याची माहितीही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. 

सद्यस्थितीत या मार्गावर धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या (एक्सप्रेस) गाड्यांमुळे उपनगरीय गाड्यांच्या गतीवर परिणाम होत आहे. अनेक वेळा एक्सप्रेस क्रॉसिंगकरिता लोकल गाड्या थांबवून ठेवाव्या लागातात. परंतु या 5व्या आणि 6व्या रेल्वे मार्गिका खुल्या झाल्यावर जलद, धिम्या लोकल सेवा आणि एक्सप्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होणार आहेत. परिणामी क्रॉसिंगमुळे वाया जाणारा लोकल प्रवाशांचा वेळ वाचणार असून उपनगरीय रेल्वे सेवा अधिक गतिमान होईल. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते कल्याण तसेच ठाणे ते कल्याण मार्गावर लोकल फेऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होऊन प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल असा विश्वासही डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे