शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

कल्याण-शीळ रस्त्याचे काम होणार वर्षभरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 12:38 AM

खासदारांची माहिती; राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकांसह केली खड्ड्यांची पाहणी

कल्याण : भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचे सहापदरी काँक्रिटीकरणाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण होईल, अशी माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी दिली.भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी शिंदे यांनी केली. त्यानंतर ते बोलत होते. शीळ सर्कलपासून शिंदे यांनी पाहणी दौऱ्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापक राधेश्याम मोपलवार, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे आदी उपस्थित होते.कल्याण-शीळ रस्त्यावर पावसामुळे पडलेले खड्डे तातडीने बुजवावेत, असे आदेश शिंदे यांनी यावेळी दिले. रस्त्यालगतच्या गावांतून वाहने थेट प्रमुख रस्त्यावर येतात. तेथे रस्ता उंच सखल आहे. तो नीट करावा, असे त्यांनी सांगितले.लॉकडाऊनमुळे बंद असलेले या रस्त्याचे काम आता पुन्हा सुरू झाले आहे. मागील पाच महिन्यांत या रस्त्याचे काम शीळ ते कोनगाव या दरम्यान बºयापैकी पूर्ण करण्यात आले आहे. या रस्त्याचे भूसंपादन काही ठिकाणी झालेले नाही. या रस्त्याच्या यापूर्वीच्या कामाच्या वेळी काही लोकांना भूसंपादनाचा मोबदला दिला गेला नव्हता. महाविकास आघाडी सरकारने त्यांचाही विचार सहानुभूतीपूर्वक व संवेदनशील मनाने केला आहे. त्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातले आहे. जेथे भूसंपादनाचा विषय रखडला आहे, तेथे काम सुरू करता आलेले नाही. ठाणे महापालिका हद्दीतील रस्त्याचे भूसंपादन बाकी आहे. केडीएमसी हद्दीतील भूसंपादन पूर्ण झालेले आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.दरम्यान, पाहणी दौºयावेळी पलावा जंक्शन येथे राज्य रस्ते विकास महामंडळाचे खड्डे बुजविण्याचे पथक भरपावसात खड्डे बुजवितानादिसून आले.पत्रीपूल महिनाभरात होणार खुलाखासदार शिंदे यांनी नवीन पत्रीपुलाच्या कामाचीही पाहणी केली. पत्रीपूल धोकादायक झाल्याने नियोजन नसताना तो पाडण्यात आला. तरीदेखील पत्रीपुलाच्या कामाला गती दिली आहे. वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. सध्या एक मोठा गर्डर चढविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या महिनाभरात हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल, असा दावा शिंदे यांनी केला आहे.