शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

भिवंडी-कल्याण मार्गावर लाकडाच्या वखारीतील कारखान्यास आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 19:10 IST

भिवंडी : भिवंडी-कल्याण मार्गावरील कोन गावात रस्त्यालगत असलेल्या राममंदिर शेजारील वखारीतील कारखान्यात दुपारनंतर आग लागून त्यामध्ये विविध साहित्याचे सामान जळून खाक झाले. या घटनेने परिसरांत घबराट पसरून नागरिकांनी घराबाहेर पळ काढला.कोन गावात लाकडाच्या वखारी मागील भागात लाकडाचे सोफा,पाळणे व इतर लाकडाच्या साहित्य बनविण्याचा कारखाना होता. हा कारखाना पत्र्याच्या शेडमध्ये सुरू ...

ठळक मुद्देकारखाना पत्र्याच्या शेडमध्ये सुरूआग लागून त्यामध्ये विविध साहित्याचे सामान जळून खाकअग्निशामकदलच्या गाड्यांसाठी पोलीसांनी रोखली वहातूक

भिवंडी : भिवंडी-कल्याण मार्गावरील कोन गावात रस्त्यालगत असलेल्या राममंदिर शेजारील वखारीतील कारखान्यात दुपारनंतर आग लागून त्यामध्ये विविध साहित्याचे सामान जळून खाक झाले. या घटनेने परिसरांत घबराट पसरून नागरिकांनी घराबाहेर पळ काढला.कोन गावात लाकडाच्या वखारी मागील भागात लाकडाचे सोफा,पाळणे व इतर लाकडाच्या साहित्य बनविण्याचा कारखाना होता. हा कारखाना पत्र्याच्या शेडमध्ये सुरू होता.त्यामध्ये रक्झीन,फोम,लाकडाच्या वस्तु तसेच विविध वस्तू बनविण्यासाठी लागणारे वॉर्निश सारखे रसायने साठविलेले होते. कारखान्या शेजारी मोटार गॅरेज असुन त्यामध्ये वेल्डींगचे काम सुरू असते. आज दुपारनंतर अचानक या कारखान्याला लागलेल्या आगीने पत्र्याच्या शेडमधील सामानाने पेट घेतला. लाकडाच्या वखारीत व कारखान्यात आग प्रतिबंधक साहित्य नसल्याने हळूहळू आगीचे लोळ संपूर्ण कारखान्यात पसरून कारखाना आगीच्या विळख्यात सापडला. आगीचे रौद्ररूप पहाता कारखान्याच्या आजूबाजूला असलेल्या रहिवाश्यांनी आपापली घरे बंद करून घराबाहेर धूम ठोकली. या घटनेत सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच कल्याण-डोंबीवली महानगरपालिका व भिवंडी महानगरपालिकेतील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.भिवंडी-कल्याण मार्गावर झालेल्या या घटनेचा परिणाम वहातूकीवर झाला.पोलीसांनी अग्निशामकदलास वाट मिळावी म्हणून या मार्गावरील वहातूक रोखून धरल्याने वहातूक कोंडीत वाढ झाली. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांचे हाल झाले.सुमारे दोन तासानंतर अग्निशामक दलास आग नियंत्रणात आणण्यात यश मिळाले.त्यानंतर या मार्गावरील वहातूक पोलीसांनी सुरळीत केली.दरम्यान महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाकडे या घटनेची माहिती नव्हती.या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात जळीत म्हणून नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडीfireआग