शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 22:20 IST

ठाणे शहर पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या सारिका पवार (21, रा. कळवा, मनीषानगर) या पोलीस कॉन्स्टेबल महिलेने बुधवारी दुपारी 2 ते 2.30च्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली.

ठाणे, दि. 6 - ठाणे शहर पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या सारिका पवार (21, रा. कळवा, मनीषानगर) या पोलीस कॉन्स्टेबल महिलेने बुधवारी दुपारी 2 ते 2.30च्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.मूळ अहमदनगर जिल्ह्यातील असलेल्या सारिका या 2014 मध्ये ठाणे शहर पोलीस दलात भरती झाल्या होत्या. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना ठाणे शहर आयुक्तालयातील मुख्यालयात नेमणूक मिळाली होती. अविवाहित असल्यामुळे दोन ते तीन सहकारी महिला कॉन्स्टेबलसमवेत त्या कळव्यातील मनीषानगर भागात राहत होत्या. बुधवारी दुपारी 2 ते 2.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू असल्यामुळे रात्री 9पर्यंत कळवा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला नव्हता. कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.एम. बागवान आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी चिठ्ठीही मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, उत्तरीय तपासणीसाठी तिचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून तिचे कुटुंबीय आल्यानंतर त्यांच्या ताब्यात हा मृतदेह दिला जाणार आहे............................तो फोनवर बोलण्यासाठी बाहेर पडला...यासंदर्भात एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार सारिका आणि तिचा भावी पती मनीषानगरमधील घरातच होते. एक फोन आल्यामुळे तो बाहेर पडला. त्याच वेळी तिने घरात हा गळफास घेतला. फोनवरील संभाषण संपल्यानंतर त्याने खिडकीतून आत पाहिले, त्या वेळी हा प्रकार त्याच्या निदर्शनास आला. त्यानंतर, त्याने धावाधाव करत पोलीस आणि शेजा-यांना बोलावले. तोपर्यंत मात्र खूप उशीर झाला होता. या दोघांचे दिवाळीमध्ये लग्न होणार होते. दोघेही एकाच गावचे आहेत. दोन्ही घरच्या संमतीनेच हे लग्न जुळले होते. मग, अशी कोणती चर्चा झाली की, तो बाहेर गेल्यानंतर तिने इकडे आत्महत्या केली. या सर्वच बाबींचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.