शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात विनयभंग करणाऱ्याला महिलेने दाखविला दुर्गेचा अवतार: नागरिकांच्या मदतीने दिला चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 22:41 IST

आपल्या पतीला जेवणाचा डबा घेऊन जाणा-या एका ३० वर्षीय महिलेचा विनयभंग करुन मोटारसायकलीवरुन पळून जाणा-यास एका दक्ष नागरिकाने पाठलाग करुन पकडले. त्यानंतर या महिलेने अक्षरश: दुर्गेचा अवतार दाखवित त्याला चांगलाच चोप देऊन नंतर पोलिसांच्या हवाली केल्याची घटना गुरुवारी मानपाडा भागात घडली.

ठळक मुद्देदक्ष नागरिकांनी पकडलेचितळसर पोलिसांच्या केले स्वाधीन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मानपाडा येथे आपल्या पतीला डबा देण्यासाठी जाणाºया ३० वर्षीय महिलेचा विनयभंग करणाºया संदेश मोडक (३८, रा. बाळकूम, ठाणे ) याला चितळसर पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. पायी जाणाºया या महिलेचा विनयभंग केल्यानंतर एका दक्ष नागरिकाने बघितले. नंतर त्याचा पाठलाग करुन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.मानपाडा येथील एमएमआरडीएच्या दोस्ती रेंटलमधील एका इमारतीमध्ये ही महिला वास्तव्याला आहे. जवळच असलेल्या एका खासगी इमारतीमध्ये तिचे पती सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला असल्याने ती २२ आॅक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी पायी जात होती. त्याचवेळी तिथून मोटारसायकलवरुन जाणाºया संदेशने तिचा विनयभंग करुन तो पुढे निघून गेला. हा प्रकार त्याच भागातील एका दुकानाचे व्यवस्थापक चंद्रशेखर जनार्दन (३५) यांच्या निदर्शनास आला. त्या महिलेचा विनयभंग करणारी व्यक्ती तिच्या ओळखीची नसल्याची त्यांनी खात्री केली. तेंव्हा प्रसंसगावधान राखून त्यांनी पाठलाग करुन त्याला पकडले. त्याचवेळी या महिलेनेही आपल्या पतीला या प्रकाराची माहिती दिली. तिच्या पतीसह जमलेल्या नागरिकांनी संदेशला चांगलाच प्रसाद दिला. त्यानंतर त्याला चितळसर पोलिसांच्या त्यांनी स्वाधीन केले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन सहायक पोलीस निरीक्षक प्रविण सुरवाडे यांनी त्याला अटक केली. रस्त्यावर घडलेल्या या घटनेनंतर यातील आरोपीला पाठलाग करुन पकडणाºया जनार्दन यांचे परिसरातून कौतुक होत आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग