शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
3
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
4
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
5
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
6
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
7
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
8
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
9
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
10
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
11
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
12
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
13
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
14
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
15
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
16
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
17
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
18
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
19
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
20
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीसह महिलेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:05 IST

आरोपी फरार : उत्तर प्रदेशातून पळून आलेल्या मुलीवर ओढवले संकट

भिवंडी : सावत्र आईच्या जाचाला कंटाळून दहावीत शिकणारी अल्पवयीन मुलगी दिल्ली येथील आत्येबहिणीकडे जाण्यासाठी उत्तर प्रदेशमधील महागावा रेल्वेस्टेशनवर आली असता, रेल्वे चौकीदाराने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर, त्याच्या तावडीतून सुटलेल्या मुलीवर चौकीदाराच्या दोघा मित्रांनी आधार देण्याच्या बहाण्याने दोन दिवस खोलीत डांबून अमानुष अत्याचार केले. यातील एका नराधमाने या मुलीस गोदान एक्स्प्रेसने भिवंडीतील मित्राकडे आणून तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना बुधवारी उघड झाली. दुसऱ्या घटनेत एका तीसवर्षीय महिला कामगारावर कंपनीमालक व त्याच्या गाडीचालकाने बलात्कार केल्याचे उघड झाले.

मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणात शांतीनगर पोलीस ठाण्यात बबलू, इकरार, संतोष यादव या तिघांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी सराईख्वाजा पोलीस ठाणे, उत्तर प्रदेश यांच्याकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. पीडित मुलगी सावत्र आईचा जाच असह्य झाल्याने दिल्लीतील आत्येबहिणीकडे जाण्याकरिता पहाटेच्या सुमारास महागाव रेल्वेस्टेशनवर पोहोचली. तिने रेल्वेचा चौकीदार बबलू याच्याकडे ट्रेनबाबत विचारणा केली असता त्याने तिला चौकीच्या आतमध्ये बोलावून तिच्यावर बलात्कार केला. त्याच्या तावडीतून सुटका झाल्यावर इकरार आणि संतोष यादव या दोघांनी तिला मदत करण्याच्या बहाण्याने भंडारी रेल्वेस्टेशनलगतच्या एका भाड्याच्या खोलीत कोंडून ठेवून दोन दिवस बलात्कार केला. त्यानंतर संतोष यादव याने जौनपूर रेल्वेस्टेशनवरून पीडित मुलीला बळजबरीने गोदान एक्स्प्रेसमध्ये बसवून कल्याण येथे उतरवून बुधवारी भिवंडीतील शांतीनगर येथे राहणारा मित्र सोहराब सरबतवाला याच्या घरी आणले होते. मात्र, सदर मुलीबाबत स्थानिकांना संशय आल्याने त्याची खबर शांतीनगर पोलिसांना मिळाली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांनी मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी मुलीने आपबिती कथन केली असता पोलिसांनाही धक्काच बसला. ही कुणकुण लागताच संतोष यादव आणि सोहराब सरबतवाला हे फरार झाले. पीडित मुलगी भिवंडीच्या बालसुधारगृहात असून तिला उत्तर प्रदेश पोलिसांच्या सुपूर्द करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांनी दिली.

कामावरून काढण्याचा धाक दाखवून अत्याचारअंजूरफाटा रोडवरील महावीर कम्पाउंडमध्ये धाग्याच्या कंपनीत काम करणाºया तीसवर्षीय महिला कामगारावर कंपनी मालक सुभाष गोपाल मालुसरे (४०, गौतमनगर ,कुर्ला प.) व मोटारचालक संतोष जाधव ऊर्फबाबू (३५, कुर्ला) यांनी बलात्कार केल्याचा गुन्हा नारपोली पोलीस ठाण्यात दाखल झाला.

या दोघांनी कामावरून काढून टाकण्याची धमकी देऊन तिच्यावर कळवा येथील लॉजवर व कंपनीतील एका रूममध्ये बलात्कार केला. या दोघांचे अत्याचार वाढल्याने महिलेने नारपोली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास एपीआय लक्ष्मण चव्हाण करत आहेत.

टॅग्स :Rapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी