शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून महिलेला लुबाडले, संकेतस्थळावरून घेतली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 21:06 IST

ठाणे : शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरून महिलेची माहिती काढल्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्याकडून एक लाख दोन हजारांचा ऐवज लुबाडणा-या सुशांत पवार याच्याविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

ठाणे : शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरून महिलेची माहिती काढल्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्याकडून एक लाख दोन हजारांचा ऐवज लुबाडणा-या सुशांत पवार याच्याविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या भामट्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.वाडा (जिल्हा पालघर) येथील एका ३८ वर्षीय महिलेची सुशांतने आधी वरील संकेतस्थळावरून माहिती काढली. तिला लग्नासाठी होकार कळवून तिला लग्नाचे आमिष दाखवले. येत्या काही दिवसांत लग्न करणार असल्यामुळे हे दोघेही ठाण्यात काही ठिकाणी फिरले. नंतर त्याने दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने ठाण्याच्या रामचंद्रनगर येथील ‘सागर ज्वेलर्स’ या दुकानात नेले. तिथे दोघांनीही शीतपेय घेतले.तिच्या शीतपेयात त्याने गुंगीचे औषध टाकून तिच्याकडील १६ ग्रॅम ५०० मिलिग्रॅम वजनाची सोनसाखळी तसेच इतर दागिने आणि १६ हजारांची रोकड असा एक लाख दोन हजार १०० रुपयांचा ऐवज तिच्या पर्समधून काढून त्याने ३० आॅक्टोबर २०१७ रोजी संध्याकाळी ६ ते रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास पलायन केले. त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो न सापडल्याने तिने अखेर याप्रकरणी १४ नोव्हेंबर रोजी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात सुशांतविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक व्ही.एस. लभडे हे अधिक तपास करत आहेत.

 

टॅग्स :thaneठाणे