लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : पतीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाचा संशय घेऊन महिलेने महिलेवर चाकूने वार केल्याची घटना न्यायालयासमोरील रस्त्यावर घडली. पिडीत महिलेस उपचारासाठी इंदिरा गांधी रूग्णालयात दाखल केले आहे.आसमा उर्फ तमन्ना जावेद अन्सारी (२५) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून धामणकर नाका परिसरात मोलमजुरी करणाऱ्या महिलेसोबत आपल्या पतीचे संबंध असल्याचे तिला समजले होते.त्यामुळे ती तीच्या शोधात होती. आसमा हिने पिडीत महिलेस न्यायालयासमोरच्या रस्त्यावर गाठून ‘माझ्या पतीचा नाद सोडून दे’असा दम भरल्यानंतर दोघींमध्ये वाद झाला. तेव्हा रागावलेल्या आसमाने तिच्याजवळील चाकूने पिडीत महिलेच्या पोटावर वार केले.जखमी महिला जमिनीवर कोसळल्यानंतर तिच्यासोबतच्या महिलांनी तिला इंदिरा गांधी रूग्णालयात दाखल केले. निजामपूर पोलिसांनी पिडीत महिलेच्या तक्रारीनुसार आसमा उर्फ तमन्ना हिच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भिवंडी बस स्थानकातून आसमा हिला अटक केली. तिला न्यायालयात हजर केले असता ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
महिलेने केले महिलेवर वार
By admin | Updated: June 29, 2017 02:38 IST