शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात ५ फूट खड्यात पडून महिला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 18:29 IST

लोकमान्य नगर परिसरातील घटना 

ठाणे :शहरातील खड्ड्यांबाबत एकीकडे ठाण्यातील राजकीय वातावरण चागंलेच तापले असताना बुधवारी ५ फूट खोल खड्ड्यात पडून एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना लोकमान्य नगर परिसरात घडली आहे. पहाटे ५.३० च्या सुमारास ही महिला या खड्ड्यात पडली असून वेळेत त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांमुळे पुढचा अनर्थ टळला.  या घटनेमुळे स्थानिक नागरिक मात्र संतप्त झाले आहेत. रस्त्याच्या खाली असलेल्या शहरातील सर्वच चेंबर आणि ड्रेनेज लाईनचे ऑडिट करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. प्रीती सिंग यांना उपचारांसाठी पालिकेच्या कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

  ढवळे नगर परिसरात राहणाऱ्या प्रीती सिंग (२६) या बुधवारी पहाटे ५.३० च्या दरम्यान भाजी आणण्यासाठी नेहमीप्रमाणे निघाल्या. लोकमान्य बस डेपो जवळ असलेल्या रस्त्यावर आल्यानंतर या रस्त्यावर जवळपास ५ फूट खड्डा पडला असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. या खड्ड्यात त्या पडल्यानंतर पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर जास्त वर्दळ देखील नव्हती. मात्र मॉर्निग वॉक करणारे काही नागरिक उपस्थित होते . प्रीती सिंग यांनी खड्ड्यातूनच  बाहेर आवाज दिला आणि रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांनी त्यांचा आवाज आल्याने त्यांना या खड्ड्यातून बाहेर काढले. प्रीती सिंग यांचा आवाज जर बाहेर गेला नसता तर त्यांच्या जीवावर देखील बेतले असते. त्यामुळे महापालिका प्रशासनाचा पुन्हा एकदा गलथान कारभार समोर आला आहे. 

 या रस्त्याच्या खाली ड्रेनेज लाईन गेली असून त्याचा हा खड्डा पडला आहे . वर झाकण टाकून डांबर टाकण्यात आले होते असा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे .  मात्र गेल्या १० महिन्यातील ही दुसरी घटना असून या रस्त्याच्या देखभालीकडे ठेकेदारांचे लक्ष नसून शहरातील सर्वच रस्त्याच्या खाली असलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामांचे ऑडिट करण्याची मागणी आता स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे. दरम्यान ठाणे महापालिकेकडून घटना घडल्यानंतर आता या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे .           मी रोज नियमितपणे भाजी आणायला जाते. ज्या ठिकाणी खड्ड्यात पडले त्या ठिकाणी बोर्ड लावण्यात आला होता. मात्र पहाटेच्या वेळी हा खड्डा लक्षात आला नाही. खड्ड्यात पडल्यानंतर मी खालून जोरात आवाज दिल्यानंतर एका दांपत्याने आवाज एकूण स्थानिकांच्या मदतीने मला बाहेर काढले. जर कोणी माझा आवाज एकला नसता तर हा प्रकार माझ्या जीवावर देखील बेतला असता. दुसऱ्यांबरोबर असा प्रकार होऊ नये यासाठी पालिकेने खबरदारी घेणे आवश्यक आहे.                                                - प्रीती सिंग , जखमी महिला

टॅग्स :tmcठाणे महापालिका