शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात तरुणीचा मृत्यू; ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा

By पंकज पाटील | Updated: October 2, 2022 16:48 IST

ट्रेलर चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून उजव्या बाजूने ओव्हरटेक करताना गाडी दाबल्याने रिद्धी व तिच्या सोबत स्कुटीवर बसलेली रिया शर्मा तोल जाऊन खाली पडली.

बदलापूर - ट्रेलर चालकाने ओव्हरटेक करताना गाडीस दाबल्याने स्कुटीवरून पडून ट्रेलरच्या चाकाखाली आल्याने रिया शर्मा (२०) या तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना बदलापूरात घडली आहे. शनिवारी (ता.१) संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास बदलापूर पूर्वेकडील खरवई नाका परिसरात हा अपघात झाला. शिरगाव आपटेवाडी परिसरात राहणारी रिद्धी साठे (२२) ही तरुणी ऍक्टिव्हा स्कुटीवरून खरवई नाका येथे जात असताना सीएनजी पंपाजवळ पाठीमागून भरधाव वेगाने एक ट्रेलर आला. 

ट्रेलर चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून उजव्या बाजूने ओव्हरटेक करताना गाडी दाबल्याने रिद्धी व तिच्या सोबत स्कुटीवर बसलेली रिया शर्मा तोल जाऊन खाली पडली. त्यावेळी ट्रेलरच्या डाव्या चाकाचा मार रिया शर्माच्या डोक्याला लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाला. तर रिद्धी साठे हिच्या उजव्या हाताला दुखापत झाली. दरम्यान, याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात ट्रेलर चालक अब्दुला खान (४२) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि एच एम कुलकर्णी अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :Accidentअपघातbadlapurबदलापूर