शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये सेक्स रॅकेट चालविणा-या महिलेला अटक: सहा महिलांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 17:21 IST

पैशाचे अमिष दाखवून ‘सेक्स रॅकेट’ चालविणा-या एका महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने कल्याणमधून गुरुवारी रात्री अटक केली. तिच्याविरुद्ध महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपैशाचे अमिषाने जाळयात ओढायचीठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाईहॉटेलमध्ये सापळा रचून पोलिसांनी केली अटक

ठाणे : परिस्थितीने असहाय असलेल्या महिला तसेच तरुणींना हेरून त्यांना पैशाचे आणि नोकरीचे अमिष दाखवून ‘सेक्स रॅकेट’ मध्ये ओढणा-या वंदना चव्हाण या महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून गुरुवारी रात्री अटक केली. तिच्या ताब्यातून सहा पिडीत महिलांची सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.कल्याण पश्चिमेच्या एका खासगी शाकाहारी हॉटेलमध्ये वंदना नावाची महिला दोन हजारांच्या बदल्यात तरुणींना शरीर विक्रयासाठी पुरवित असल्याची ‘टीप’ अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. तिच्या आधारे १५ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकाजवळील ‘हॉटेल संतोष रेस्टॉरन्ट’ मध्ये आलेल्या चव्हाण या महिलेकडे बनावट गि-हाईक पाठवून याबाबतची पोलिसांनी खात्री केली. तेंव्हा पैसे मिळताच सहा महिलांना ती घेऊन आली. त्याचवेळी निरीक्षक दौंडकर यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक सतिश वाळके, उपनिरीक्षक कल्याणी पाटील, जमादार राजू महाले, हवालदार अविनाश बाबरेकर, पोलीस नाईक निशा कारंडे, सरस्वती कांबळे आणि बेबी मशाळ आदींच्या पथकाने तिला अटक केली. तिच्याकडून या २५ ते ३५ वयोगटातील महिलांची सुटका केली. पुण्याच्या अवसरी भागातील ती रहिवाशी असून पतीला दुर्धर आजार असल्यामुळे त्यांना कामधंदा नाही. त्याच मजबुरीने आपण हे काम करीत असल्याचे तिने चौकशीत पोलिसांना सांगितले. दोन हजारांमध्ये ‘सौदा’ पक्का झाल्यानंतर १५०० रुपये ती स्वत:कडे ठेवायची तर या मुलींना ती पाचशे रुपये देऊन त्यांच्याकडून ती हा व्यवसाय करून घेत होती, असेही तपासात उघड झाले आहे. तिच्याविरुद्ध महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिचे आणखी कोणी साथीदार आहेत का? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेsex crimeसेक्स गुन्हाPoliceपोलिस