शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

हॉटेलमध्ये शरीर विक्रयाचा व्यवसाय करणाऱ्या महिलेस अटक: दोन पिडित तरुणींची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 19:37 IST

चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातील एका हॉटेलमध्ये मागणीप्रमाणे तरुणींचा पुरवठा करुन त्यांच्याकडून शरीर विक्रयाचा ...

ठळक मुद्दे ठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कामगिरीचितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा

चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हालोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील एका हॉटेलमध्ये मागणीप्रमाणे तरुणींचा पुरवठा करुन त्यांच्याकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय करुन घेणाºया अफसाना उर्फ जान्हवी लष्कर (३३, रा. वागळे इस्टेट, ठाणे) या महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. तिच्या तावडीतून दोन पिडित तरुणींची सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.एका ठराविक मोबाईल क्रमांकावर फोन केल्यानंतर एक महिला शरीर विक्रयासाठी काही तरुणींचा पुरवठा करते, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे या पथकाने सहायक पोलीस आयुक्त सुनिल बाजारे यांच्या मार्गदर्शनाखाली माजीवडा येथील हॉटेल कॅपिटॉल येथील एक रुम बुक करुन या महिलेकडे मुलींबाबत विचारणा केली. एका बनावट गिºहाईकाच्या मदतीने ठराविक रक्कम ठरल्यानंतर १० डिसेबर रोजी सायंकाळी ५.५० वाजण्याच्या सुमारास या पथकाने या हॉटेलमध्ये सापळा लावला. त्यावेळी दोन तरुणींना घेऊन आलेल्या अफसाना या महिलेला गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले. काही पैशांचे अमिष दाखवून या तरुणींकडून ती शरीरविक्रयाचा व्यवसाय करुन घेत असल्याचे चौकशीमध्ये उघड झाले. याप्रकरणी जमादार भगवान थाटे यांनी चितळसर पोलीस ठाण्यात या आरोपी महिलेविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. तिला ११ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. तिचे या रॅकेटमध्ये आणखी कोणी साथीदार आहेत का? याचाही तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीSex Racketसेक्स रॅकेट