शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अधिसूचनेशिवायच समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन, शेतकऱ्यांना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 03:24 IST

समृद्धी महामार्गात जागा जाणाºया शेतकºयांना मोबदला चांगला मिळत असल्याने दलालांनी अनेक शेतकºयांना गंडा घालण्याचे काम केले आहे.

पंकज पाटीलअंबरनाथ : समृद्धी महामार्गाव्यतिरिक्त इतर कामासाठी भूसंपादन केले जाणार असून ती जागा नेमकी कोणती आहे, याची कल्पना केवळ अधिकारीवर्गालाच आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी दलालांची फळी पुढे करून शेतकºयांच्या जागा समृद्धी महामार्गात खरेदी करण्याचे काम सुरू केले. शेतकºयांनाही मोबदला चांगला मिळत असल्याने त्यांनी जागा देण्यासाठी दलाली देण्याची कबुली दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात ही जागा जाणारच आहे, याची कल्पना शेतकºयांना नसल्याने त्यांची दलालांमार्फत फसवणूक होत असल्याचा आरोप समृद्धीबाधित शेतकरी संघटनेने केला आहे.

समृद्धी महामार्गात जागा जाणाºया शेतकºयांना मोबदला चांगला मिळत असल्याने दलालांनी अनेक शेतकºयांना गंडा घालण्याचे काम केले आहे. समृद्धीच्या मूळ प्रस्तावासोबत इतर जागा समृद्धी महामार्गाच्या अनुषंगाने घेण्यात येणार आहे. मात्र, ती जागा नेमकी कोणती आहे, याची कल्पना शेतकºयांना नाही. याचे सर्व आराखडे अधिकाºयांकडे असल्याने जी जागा समृद्धीसाठी घेण्यात येणार आहे, त्या जागेच्या ठिकाणी असलेल्या शेतकºयांना फसवण्याचे काम दलालांनी सुरू केले आहे. शेतकºयांची जागा समृद्धीत जात असताना त्याच शेतकºयाला ती जागा समृद्धीमध्ये घेण्याचे आश्वासन दिले जात आहे. मुळात ती जागा जाणार आहे, याची कल्पना नसल्याने शेतकरी जागा यावी, यासाठी दलालांच्या आश्वासनांना बळी पडत आहेत. जागा गेल्यावर टक्केवारी ठरत असल्याने शेतकºयांच्या हक्काचे पैसे नाहक दलालीपोटी जात आहेत. मुळात शेतकºयांची जी जमीन जाणार आहे, त्या जागेचे नोटीफिकेशन तसेच त्याची प्रसिद्धी करणे गरजेचे आहे. तरच त्याची माहिती शेतकºयांना होईल. मात्र, नोटीफिकेशन न झाल्याने शेतकºयांना आपली जागा जात आहे, याची कल्पनाच नाही. याच संधीचा फायदा घेत अधिकाºयांनी नेमलेल्या दलालांमार्फत शेतकºयांसोबत परस्पर आर्थिक व्यवहार करून भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे. उशीद गावाच्या परिसरातील शेतकºयांना त्याचा फटका बसला आहे. उशीद गावातील अनेक शेतकºयांची जमीन जात असतानाही नोटीफिकेशन न काढताच भूसंपादनाची प्रक्रिया केल्याचा आरोप चंद्रकांत भोईर यांनी केला आहे.शेतकºयांना मोबदला वाढवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात दलालांनी दलाली लाटली आहे. भूसंपादन करताना शेतकºयांच्या शेतातील झाडांची संख्या आणि त्याचे मूल्य वाढवून घेण्याचे काम केले. सोबत, घर असलेल्या जागेवरील घरांचे मूल्य जास्त दाखवत शेतकºयांना पैसे देण्यात आले. मात्र, त्या पैशांतून दलाली लाटण्यात आली आहे. अधिकाºयांनी याच मार्गाने मोठी माया जमवल्याचा आरोप भोईर यांनी केला.यासंदर्भात शासनस्तरावर तक्रार केली आहे. जिल्हाधिकारी यांनी यासंदर्भात अधिकाºयांना ताकीद दिलेली होती. या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी भोईर यांनी केली. भूसंपादनाची जबाबदारी ही अधिकाºयांवर असल्याने थेट कोणताच व्यवहार अधिकाºयांसोबत झाला नाही. मात्र, अधिकाºयांनी नेमलेले दलाल हे गबर झाले आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी झाल्यास समृद्धीमध्ये सर्वाधिक लाभार्थी हे अधिकारी आणि दलाल असल्याचे चित्र त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गthaneठाणे