शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

चौकशी न करताच कोणाला जबाबदार कसे धरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 00:31 IST

केडीएमसीच्या हद्दीत अग्यार समितीच्या अहवालानुसार ६८ हजार बेकायदा बांधकामे आहेत.

- मुरलीधर भवार केडीएमसीच्या हद्दीत अग्यार समितीच्या अहवालानुसार ६८ हजार बेकायदा बांधकामे आहेत. बेकायदा बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. बेकायदा बांधकामांना कारवाईस अधीन राहून मालमत्ताकर लावला जातो. बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा विषय मार्गी लागलेला नाही... याविषयी महापालिकेच्या बेकायदा बांधकाम नियंत्रण खात्याचे उपायुक्त सुनील जोशी यांच्याशी साधलेला संवाद...बेकायदा बांधकामांना जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात काय कारवाई करणार?बेकायदा बांधकामे होण्यास कोणते अधिकारी जबाबदार आहे, हे याप्रकरणी चौकशी झाल्यावरच कळू शकते. चौकशीआधीच कोणाला दोषी धरता येत नाही. चौकशीपश्चात जे अधिकारी जबाबदार आहेत, त्यांची नावे कळू शकतील. त्यानंतरच त्यांना बेकायदा बांधकामास जबाबदार धरून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करता येऊ शकते.बिल्डरांविरोधात कारवाई केली जातनाही, याविषयी तुमचे मत काय?बेकायदा बांधकाम करणारे जमिनीचे मालक व बिल्डर यांच्याविरोधात महापालिकेस तक्रार प्राप्त झाल्यावर महापालिका अधिनियम व नगररचना अधिनियमानुसार शहानिशा करून तक्रार खरी असल्यास संबंधित बिल्डर व जमीनमालकाच्या विरोधात महापालिका गुन्हा दाखल करते. महापालिकेने अग्यार समितीच्या अहवालानुसार बेकायदा बांधकामांची यादी पालिकेच्या वेबसाइटवर नागरिकांच्या माहितीसाठी टाकली आहे.बेकायदा बांधकामांवर तोडगा काय?बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी सरकारने अनेकदा परिपत्रके काढलेली आहेत. मात्र, बेकायदा बांधकामे नियमित करून घेण्यासाठी बिल्डर रस दाखवत नाही. त्यामुळे नियमितीकरणाच्या प्रक्रियेस प्रतिसाद मिळत नाही.>नागरिकांनीही घर घेताना ज्या इमारतीत अथवा चाळीत घर घेणार आहे, ती इमारत व चाळ अधिकृत आहे की नाही, याची शहानिशा करूनच घर घ्यावे. त्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या नगररचना विभागात जाऊन चौकशी केली पाहिजे.>नागरिकांनी फसवणूक होण्यापासून वाचण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजेज्याठिकाणी घर घेणार आहे, त्या बिल्डरने सर्व परवानग्या घेतल्या आहेत की नाही, त्याचा गृहप्रकल्प अधिकृत आहे की नाही, याची माहिती घेऊनच घरखरेदी केल्यास त्यांची फसवणूक टाळता येऊ शकते. याविषयीची माहिती महापालिकेकडून दिली जाते. ही खबरदारी घर घेण्यापूर्वीच घेतल्यास नागरिकांवर बेकायदा बांधकामात घर घेतल्यानंतर बेघर होण्याची वेळ येणार नाही.