शहरं
Join us  
Trending Stories
1
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
2
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
3
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
4
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
5
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
6
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
7
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
8
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
9
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
10
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
11
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
12
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
13
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
14
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
15
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
16
'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
17
IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)
18
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
19
‘हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
20
मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान भोसरीत इमारतीवर आग; स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली आग
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरवासीयांचे पाणी महागणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:39 IST

उल्हासनगर : महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी २०२१-२२ या वर्षाचा ४३० कोटींचा अर्थसंकल्प शुक्रवारी स्थायी समिती सभापती विजय ...

उल्हासनगर : महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी २०२१-२२ या वर्षाचा ४३० कोटींचा अर्थसंकल्प शुक्रवारी स्थायी समिती सभापती विजय पाटील यांच्याकडे सुपुर्द केला. उत्पन्न वाढीसाठी मालमत्ता, पाणीपट्टी करात दरवाढ सुचविण्यात आली आहे.

उल्हासनगर महापालिका उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असून उत्पन्न वाढीसाठी महापालिका प्रशासन तसेच सत्ताधारी, विरोधी पक्ष अपयशी ठरल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे. या अर्थसंकल्पात कोणतीही मोठी योजना वा नावीन्यपूर्ण उपक्रम नाही. उत्पन्न वाढीसाठी नेहमीप्रमाणे आयुक्तांनी मालमत्ता व पाणीपट्टी कर दरवाढीचे संकेत दिले आहेत. उत्पन्नात १४३ कोटी मालमत्ता कर व पाणीपट्टी, १२ कोटी नवीन बांधकाम परवाने, २६० कोटी सरकारकडून मिळणारे जीएसटी अनुदान व इतर २२ कोटी यांचा समावेश असेल.

महापालिका आयुक्तांनी अर्थसंकल्पातील खर्चामध्ये १४१ कोटी कर्मचाऱ्यांचा पगार व व्यवस्थापन खर्च, ७८ कोटी एमआयडीसीची पाणी बिलापोटीची रक्कम, ५२ कोटी रस्ते विकास, १० कोटी कचरा व्यवस्थापन, ३८ कोटी शिक्षण मंडळ विभाग, उद्यान विकासासाठी ३ कोटी असा एकूण खर्च ४३० कोटींचा दाखविण्यात आला आहे. आरसीसी व गर्डर बांधकामासाठी दरमहा ६०० रुपये पाणीपट्टी दरवाढ सुचविण्यात आली. गेल्यावर्षी ही दरमहा ३०० रुपये आकारले जात होते. तर छत व पत्र्याच्या घराला दरमहा ५०० रुपये दरवाढ सुचविण्यात आली आहे. गेल्यावर्षी हा दर २५० रुपये होता. तर झोपडपट्टीकरिता दरमहा १०० रुपयांची पाणीपट्टी ४०० रुपयांची सुचविली आहे. ही दरवाढ सत्ताधारी व विरोधी पक्षांनी मान्य केल्यास ५२ कोटींचे उत्पन्न पालिकेला मिळू शकते, असे यावेळी सांगण्यात आले.

-------------------------------

अर्थसंकल्पातील प्रमुख वैशिष्ट्ये

शहरातील विद्युत व्यवस्थेच्या देखभालीसाठी ९ कोटी, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारण्याकरिता ५० लाख, रोबोद्वारे भुयारी गटाराच्या साफसफाईसाठी १ कोटी, माझी वसुंधरा उपक्रमासाठी २२ कोटी तर नवीन चार रुग्णालये बांधण्यासाठी दोन कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना महामारीमुळे पाणीपट्टी व मालमत्ता करात दरवाढ मंजुरीला सत्ताधाऱ्यांनी नकारघंटा दिल्याचे बोलले जात आहे.