शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

पापलेट नामशेष होणार?

By admin | Updated: April 25, 2016 02:56 IST

पालघर जिल्ह्यातील पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमाराना आर्थिक सुबत्ता देणारा पापलेट नामशेष होण्याची चिन्हे आहेत. पापलेट च्या मासेमारी साठी प्रसिद्ध असलेल्या

हितेन नाईक, पालघरपालघर जिल्ह्यातील पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमाराना आर्थिक सुबत्ता देणारा पापलेट नामशेष होण्याची चिन्हे आहेत. पापलेट च्या मासेमारी साठी प्रसिद्ध असलेल्या सातपाटी च्या दोन संस्थामध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत ३२४ टन ( ३ लाख २४ हजार किलो) पापलेटची आवक कमी झाली आहे. पालघर जिल्ह्यात ‘करल्या डोली’ द्वारे पापलेट च्या लहान पिल्लाची होणारी खुलेआम कत्तल हे या मागचे प्रमुख कारण असल्याचे माहित असूनही पालघर, वसई, उत्तन मधील काही मच्छीमारनी आता पासून पुन्हा करल्या डोलीच्या मच्छीमारीला मोठ्या प्रमाणात सुरु वात ही केली आहे.राज्याला ७२० किमी च विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला असून देशाला मत्स्य उत्पादनातून परकीय चलन मिळवून देणारा हा एक प्रमुख व्यवसाय आहे. परंतु मोठ्या यांत्रिकी, अद्ययावत सामुग्री युक्त नौकाद्वारे केली जाणारी अपरिमति मासेमारी, पर्ससीन जाळ्यांद्वारे होणारी विनाशकारी मासेमारी, रासायनिक करखान्यातून सोडण्यात येणारे प्रदूषित सांडपाणी, ओएनजीसी प्रकल्पातून होणारी तेल गळती, शासनाचे मच्छीमारांप्रति असलेले उदासीन धोरण इ.कारण मुळे मासेमारी व्यवसाय संपुष्टात येण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु झाली आहे.मागील अनेक वर्षा पासून राज्य शासनाने मासेमारी नियम अधिनियम १९८१ च्या अनुषंगाने १० जून ते १५ आॅगस्ट असा ६६ दिवसांचा पावसाळी मासेमारी बंदी कायदा घोषित करु न त्याची कडक अंमलबजावणी केल्याने मत्स्य प्रजनन आणि संवर्धन होवून मत्स्य उत्पादन समाधानकारक सुरु होते. परंतु अमर्याद व पर्ससीन सारख्या विनाशकारी मासेमारीमुळे दिवसेंदिवस मत्स्य उत्पादनात घट होऊ लागल्याने ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संघ, पालघर यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील सर्व संस्थानी एकजूट दाखवित १५ मे पासून संपूर्ण मासेमारी बंद ठेवून मत्स्य प्रजनन आणि संवर्धनला हातभार लावला होता. हया मच्छीमारीच्या स्तुत्य उपक्र माला शासन स्तरावरून पाठिंबा मिळून पावसाळी मासेमरी बंदी कालावधीत मोठी वाढ होईल असे मच्छीमार संस्थाना अपेक्षित असतांना आताच्या राज्य शासना सह केंद्र शासनाने १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसांचा कमी कालावधी जाहिर करून उलट मत्स्य उत्पादन घटविण्याचा विडा तर उचलला नाही ना? असा संतप्त सवाल मच्छीमारांमधून केला जात आहे.> १२ वर्षापासून सतत मोठ्या प्रमाणात या पापलेटच्या लहान पिल्लांची कत्तल होत असल्याने पापलेट या अत्यंत चविष्ट आणि एक्सपोर्ट होणाऱ््या हया माशाच्या उत्पादनाची घसरण मोठ्या वेगाने सुरु झाली आहे. च्समुद्री मात्स्यकी संशोधन केंद्र, मुंबई यांनी याबाबत मच्छीमारा मध्ये जनजागृति करून तुम्हाला चांगली आर्थिक सुबत्ता मिळवून देणाऱ्या या पापलेटला नामशेष करू नका असे अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून समजावून सांगूनही मच्छीमारांच्या मासेमारी पद्धतीमधे कुठलाही बदल झाल्याचे दिसून येत नाही. > २५ ग्रॅमच्या लहान पिलांच्या ५० किलो टपची विक्री अवघ्या २ ते ३ हजार रु पयात सध्या होत आहे. याच लहान पापलेटची वाढ पावसाळ्यानंतर चांगली होऊन मच्छीमारांना याच पापलेटचे ५० ते ५५ हजारांचे उत्पन मिळू शकते. अधिक पैशांच्या हव्यासापोटी आपण आपलेच नुकसान करत आहोत हे त्यांच्या लक्षात येऊनही ही मासेमारी थांबविण्याच्या दृष्टीने ते पावले उचलत नाहीत. चार महिन्यांपासून सातपाटीतील दोन्ही सहकारी संस्थेच्या खात्यावर पापलेट विक्र ीसाठी एकही साठा न आल्याने खरेदीसाठी लाखो रु पये अनामत रक्कम ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांनी ही अनामत काढून घेतल्याचे सर्वोदय संस्थेचे चेअरमन सुरेश म्हात्रे यानि सांगितले. हे रोखण्यास शासन आणि संबंधित सहकारी संस्था, संघटना प्रयत्न करूनही अपयशी ठरत आहेत.> अर्नाळा, वसई, उत्तन इ. भागातील मच्छीमार मोठ्या प्रमाणात करल्या डोलीचीच मासेमरी करतात. यांच्या डोलीचे आस हे दिवसें दिवस कमी होऊ लागल्याने आणि काही मच्छीमारानी दोन डोलीनची एक डोल बनविल्याने लहान पापलेटची शिकार या मासेमरी पद्धतीने मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. त्यामुळे १ एप्रिल पासून पुन्हा पालघर आणि वसई तालुक्यासह उत्तनमध्ये मोठ्या प्रमाणात पापलेटच्या लहान पिलांची बेछूट कत्तल सुरु झाली आहे. > वसई, पालघरमधील मच्छीमारानी ब्रिडिंग पिरियडमध्ये पापलेटच्या पिल्लांची मासेमारी केल्याने त्यांचेच नुकसान होते. थोडे थांबल्यास मोठे उत्पन मिळू शकते. मात्र काही मच्छीमार एकत नाहीत. - बी.पुरुषोत्तमा, शास्त्रज्ञ मात्स्यकी संशोधन केंद्र, मुंबई.