शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पर्यवेक्षकाच्या चुकीने आयटीआयच्या ३० विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:58 IST

पुनर्मूल्यांकन करणार : महाविद्यालय प्रशासनाचा दावा

ठाणे : वागळे इस्टेट येथील आयटीआय परीक्षेदरम्यान चुकीचे मार्गदर्शन केल्याने एकाचवेळी ३० विद्यार्थ्यांना शून्य गुण देण्यात आले. त्यामुळे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी मनविसेकडे धाव घेताच त्यांनी तत्काळ आयटीआय महाविद्यालयावर धडक देऊन प्रशासनाला धारेवर धरले. त्यामुळे महाविद्यालय प्रशासन ताळ्यावर आले असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणाचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. याबाबत महाविद्यालय प्रशासन काळजी घेणार असून या प्रकाराला जबाबदार शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी मनविसेने केली आहे.

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा अर्थात आयटीआयच्या माध्यमातून जुलै २०१९ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल ८ डिसेंबर रोजी आॅनलाइन घोषित करण्यात आला. प्रथम वर्ष वर्गातील विद्यार्थ्यांच्या या वार्षिक परीक्षेत टर्नर व फिटर प्रवर्गांतील तब्बल ३४ जणांना शून्य गुण देण्यात आले. याबाबत विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधला, तेव्हा परीक्षेदरम्यान वर्गात पर्यवेक्षक असलेल्या मुरलीधर सरवदे या शिक्षकाने उत्तरपत्रिकेवर लिहिली जाणारी माहिती चुकीची सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असल्याचे मनविसे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी सांगितले. पाचंगे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहराध्यक्ष किरण पाटील, सचिव सचिन सरोदे यांनी महाविद्यालय प्रशासनाची भेट घेतली. त्यांना धारेवर धरून जाब विचारला.

प्रशासनानेही मनविसेच्या पदाधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेऊन याप्रकरणी आयटीआयचे प्राचार्य एस.एम. अंबाळकर यांना लेखी निवेदन दिले. वरिष्ठ पातळीवर याबाबत दखल घेऊन कार्यवाही करण्याचे आदेश दिले. यावेळी उपविभाग अध्यक्ष विनोद भुवड, मनविसे उपविभागाध्यक्ष गणेश शेलार, प्रसाद होडे, शाखाध्यक्ष संदीप पवार, उपशाखाध्यक्ष प्रवीण जाधव व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.‘पर्यवेक्षकाकडून आम्हाला चुकीचे मार्गदर्शन’आम्हाला पर्यवेक्षकाकडून चुकीचे मार्गदर्शन करण्यात आले. परंतु, शिक्षक विद्यार्थ्यांवर खापर फोडत असल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. तर, विद्यार्थ्यांना जेव्हा चूक समजली, तेव्हा त्यांनी तत्काळ सांगायला हवी होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचीदेखील चूक आहे, अशी सारवासारव प्राचार्य अंबाळकर यांनी केली. तरीही, आम्ही वरिष्ठ पातळीवर पुनर्मूल्यांकनाची मागणी केली असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :MNSमनसे