शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 08:15 IST

८०० कोटींच्या झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी आणखी काही अधिकारीही सीबीआयच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

उरण : जेएनपीएच्या समुद्र चॅनलची खोली वाढवण्याच्या कामात ८०० कोटींच्या झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी आणखी काही अधिकारीही सीबीआयच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. यामुळे काही जेएनपीए अधिकाऱ्यांच्या गोटात खळबळ माजली आहे.

जेएनपीएने समुद्राची खोली वाढवण्याच्या कामासाठी जागतिक बँकेकडून कोट्यवधींचे कर्जही घेतले होते. समुद्राची खोली वाढवण्याच्या कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याची कुणकुण वरिष्ठ अधिकाऱ्यांना आधीच लागली होती. 

याप्रकरणी केंद्र सरकारच्या संबंधित मंत्रालयाकडूनही काही अधिकाऱ्यांची अंतर्गत चौकशी सुरू होती. दरम्यानच्या काळात ठेकेदार कंपनीची शेकडो कोटींची बिले रोखण्यात आली होती. 

जेएनपीएच्या या कृतीविरोधात ठेकेदार कंपन्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार? 

जेएनपीटीचे तत्कालीन मुख्य अभियंता सुनील कुमार मदभावी हे सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्तीनंतर मदभावी यांना वाढवण बंदराच्या संचालकपदी नियुक्त केले आहे. 

सीबीआयने गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांना वाढवण बंदराचे संचालक पदही गमवावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :JNPTजेएनपीटीCorruptionभ्रष्टाचारfraudधोकेबाजीCBIगुन्हा अन्वेषण विभाग