शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गोळवलकर चुकल्याची माफी मागणार का?, डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा भाजपला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 07:27 IST

शिवपुत्र संभाजीराजे यांच्याबाबत याआधी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना भाजपचे नेते आपले आदर्श मानत आहेत, असे आव्हाड म्हणाले.

ठाणे : अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानासाठी माफी मागावी, अशी मागणी करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी संभाजी महाराजांबद्दल, सावरकर आणि गोळवलकर यांनी केलेल्या विधानाबद्दल माफी मागावी, अशी मागणी आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली. शिवपुत्र संभाजीराजे यांच्याबाबत याआधी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना भाजपचे नेते आपले आदर्श मानत आहेत, असे आव्हाड म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म ही संकल्पना महाराष्ट्र धर्म, मराठा धर्म आणि स्वराज्य अशा अर्थाने निर्मिली होती. ‘मराठा’ ही व्यापक संकल्पना होती अन् त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व समाविष्ट झाले होते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या राज्याला रयतेचे राज्य असे म्हटले गेले होते. या रयतेच्या राज्याचे वारसदार छत्रपती संभाजीराजे हे होते.  त्यामुळे ते कुठल्या एका धर्माच्या रक्षणासाठी बाहेर पडले असे कोणतेही ऐतिहासिक संदर्भ नाहीत, असे आव्हाड म्हणाले. 

सावरकर यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकामध्ये शिवरायांच्या राज्याबद्दल काय म्हटले आहे हे सांगून मला नवीन वाद निर्माण करायचा नाही; पण सावरकरांनी या पुस्तकात संभाजी महाराजांंना आक्षेपार्ह सवयी असल्याचे लिहिले आहे. तसेच, शिवाजी महाराजांचा नाकर्ता पुत्र असेही सावरकरांनी संभाजीराजेंबद्दल लिहिले आहे.

दुसरे पुस्तक गोळवलकर यांचे ‘बंच ऑफ थॉटस्’ असून, त्यामध्ये गोळवलकर म्हणतात की, ‘संभाजी महाराज हे आक्षेपार्ह गोष्टींच्या आहारी गेले होते. ‘राजसंन्यास’ आणि ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकांमध्ये संभाजी महाराजांचे पात्र कसे रंगविले आहे याबद्दल कोणी बोलले नाही. आम्ही वारंवार त्यावर बोलत आलो आहोत. आम्ही छत्रपती संभाजीराजांना स्वराज्यरक्षक असेच संबोधत आलो आहोत, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड