शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आता फडणवीस गायकवाडांच्या घरावर बुलडोझर फिरवणार का? एमआयएमचा सवाल

By नितीन पंडित | Updated: February 4, 2024 19:10 IST

भाजपा महाराष्ट्राला बिहराच्या वाटेवर घेवून चालली आहे, एमआयएमचे डॉ अब्दुल कादरी यांचे राज्य सरकारवर ताशेरे

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी: राज्यात कायदा सुव्यवस्थेचे ठेकेदार असलेले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याला बिहारच्या वाटेवर घेऊन निघाले आहेत. मीरा भाईंदर येथील गरीब मुस्लिम समाजावर बुलडोझर चालवणारे, पोलिस ठाण्यात गोळीबार करणाऱ्या भाजपा आमदाराच्या घरावर बुलडोझर चालवणार का? असा सवाल एआयएमआयएम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ अब्दुल गफार कादरी यांनी केला आहे.

रविवारी ते भिवंडीत लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते.याप्रसंगी भिवंडी शहर कार्याध्यक्ष शादाब उस्मानी, अकरम खान,डॉ.बिलाल अंसारी,अँड. अमोल कांबळे,फरीद खान,अनीस शेख आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपा गोळीबार करणाऱ्या गायकवाड याला ही क्लिनचीट देतील जशी अजित पवार यांना भाजपाने दिली.जसे मिरा भाईंदर येथील गरीब मुस्लिम बांधवांच्या घरांवर बुलडोझर चालवला तसा आमदार गायकवाड यांच्या घरावर बुलडोझर चालवून दाखवावा, असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे .

महाराष्ट्रात पाच जागा लढवणार ?          महाराष्ट्रात एम आय एम पक्ष उत्तरमध्य मुंबई, धुळे मालेगाव,नांदेड ,भिवंडी व संभाजी नगर या पाच लोकसभा जागा लढवण्याचा विचार करीत असून त्या दृष्टीने मतदारसंघाचे सर्वेक्षण सुरू आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून वंचित दलीत अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न घेऊन संविधानाच्या रक्षणासाठी भाजपला पराभूत करण्याचा इरादा एमआयएम पक्षाचा आहे.परंतु धर्मनिरपेक्ष मतांचे ठेकेदार समजणारे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे एम आय एम पक्षाला अछूत समजत असल्याने इंडिया आघाडीने एम आय एम पक्षाला आमंत्रित केले नाही.परंतु त्यांच्या मध्ये सुध्दा  काही आलबेल नाही इंडिया आघाडीचा सर्वात मोठा ठेकेदार नितीशकुमार फरार झाले आहेत अशी घणाघाती टीका देखील यावेळी डॉ अब्दुल गफार कादरी यांनी केली आहे.

टॅग्स :Ganpat Gaikwadगणपत गायकवाडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन