जव्हार येथे हिल स्टेशन विकसित करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 02:04 AM2021-02-13T02:04:33+5:302021-02-13T02:05:56+5:30

पर्यटनासाठी जिल्ह्यात अनुकूल स्थिती

Will develop a hill station at Jawhar says cm uddhav thackeray | जव्हार येथे हिल स्टेशन विकसित करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जव्हार येथे हिल स्टेशन विकसित करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next

जव्हार : पर्यटनाच्या दृष्टीने जिल्ह्याची भौगोलिक रचना अनुकूल आहे. जिल्ह्याला विस्तीर्ण सागर किनारा लाभला आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटनस्थळांचा विकास करणे आवश्यक असून, त्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
नव्याने जिल्हा अस्तित्वात आल्याने जिल्ह्यासाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तसेच जिल्हा परिषदेच्या इमारतीचे काम लवकरच पूर्ण होऊन नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे.

कुपोषण पूर्णपणे थांबवायचे असल्याने, जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यात आला आहे. आदिवासी समाजाला मुख्य धारेत आणून पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभला आहे, तसेच जिल्ह्यात हिल स्टेशन, तसेच नैसर्गिक सान्निध्य लाभल्याने पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पर्यटनस्थळांचा विकास करण्यात येणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. जव्हार तालुक्यातील जामसर प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करताना प्रवेशद्वारावर असलेल्या फळ्यावर लिहिलेल्या हस्ताक्षराबद्दल विचारणा करून कलाप्रेमी असल्याचे दिसून आले. जामसर आराेग्य केंद्रातील सर्व वैद्यकीय कक्षांची पाहणी केल्यानंतर, विविध रंगांत बाळासाहेब ठाकरे यांचे काढलेले रांगाेळी चित्र पाहून मुख्यमंत्री आनंद व्यक्त केला. चित्रकार राहुल श्रीराम सहाने या विद्यार्थ्यासोबत आलेले कलाशिक्षक प्रवीण अवतार यांचे काैतुक केले, तसेच ढापरपाडा येथे आदिवासींनी विकसित केलेल्या पर्यटनस्थळाला भेट दिली. हा भाग खडखड धरणाला लागून निसर्गरम्य वातावरणात विकसित झाला. या भागाची पाहणी करून मुख्यमंत्री ठाकरे ढापरपाडा येथे स्नेहभोजन केले.

वारली चित्रकला नव्या पिढीपर्यंत गेली पाहिजे! पालघर जिल्ह्यातील वारली पेंटिंग कला अधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यातील चित्रांना संकल्पना देऊन विविध रंगांत रंगविण्यात यावी, यासाठी मुलांचे लहान गट करण्यात यावेत, तसेच ही कला नव्या पिढीपर्यंत देण्यासाठी प

Web Title: Will develop a hill station at Jawhar says cm uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.