शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

Sameer Wankhede : "पोलिसांना सहकार्य करणार"; समीर वानखेडे यांची पोलिसांकडून आठ तास चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 06:26 IST

Sameer Wankhede : वयाची जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन नवी मुंबईतील बारसाठी परवाना मिळविल्याचा वानखेडे यांच्यावर आरोप आहे. 

(बातमी फोटो - विशाल हळदे)Sameer Wankhede : नवी मुंबईतील हॉटेलमध्ये मद्य विक्रीच्या परवान्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी एनसीबी मुंबईचे माजी संचालक समीर वानखेडे यांची कोपरी पोलिसांनी बुधवारी सलग आठ तास चौकशी केली. वानखेडे यांच्यावर याबाबत आरोप करणारे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची मुंबईतील ईडी कार्यालयात अशीच आठ तास चौकशी सुरू असताना वानखेडे हेही ठाण्यात पोलिसांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरे जात होते. आपण तपासात पोलिसांना संपूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया वानखेडे यांनी सायंकाळी कोपरी पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना दिली. याखेरीज अधिक बोलण्यास स्पष्ट नकार दिला.  

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नवी मुंबई विभागाने वानखेडे यांच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात १९ फेब्रुवारी रोजी फसवणुकीचा गुन्हा  दाखल केला होता. याच संदर्भात त्यांना बुधवारी हजर राहण्याची नोटीस कोपरी पोलिसांनी बजावली होती. त्या पार्श्वभूमीवर आपल्या वकिलांसह बुधवारी सकाळी वानखेडे कोपरी पोलिसांसमोर हजर झाले. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे हे कामानिमित्त बाहेर असल्यामुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसुझा यांनी त्यांना साडेअकरा वाजता पोलीस ठाण्यात पाचारण केले. सायंकाळी साडेसातपर्यंत सुरू होती. 

चौकशीनंतर बाहेर पडल्यावर पोलिसांना तपासात संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे वानखेडे यांनी सांगितले. वयाची जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन नवी मुंबईतील बारसाठी परवाना मिळविल्याचा वानखेडे यांच्यावर आरोप आहे. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी नवी मुंबईत सद्गुरू बारकरिता मद्यविक्रीचा परवाना मिळविला होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर योग्य उत्तरे न मिळाल्याने ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी त्यांच्या बारचा परवानाही रद्द केला. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाने कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्याच्याच चौकशीकरिता त्यांना बुधवारी बोलावले होते. 

वानखेडे यांच्याबाबतचे प्रकरण संवेदनशील असल्याने तसेच तपास सुरू असल्यामुळे तपासातील आणि चौकशीतील भाग उघड करता येणार नाही. गरज भासल्यास वानखेडे यांना पुन्हा चौकशीला बोलावण्यात येईल. - ममता डिसुझा,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोपरी पोलीस स्टेशन, ठाणे

आता गुन्हा कसा दाखल केला? वानखेडे यांच्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा हा १९९७ साली ते अल्पवयीन असताना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अल्पवयीन असताना घडलेल्या एखाद्या गुन्ह्याबद्दल आता एफआयआर कसा नोंदविला जाऊ शकतो, असा सवाल वानखेडे यांचे वकील फैजल शेख यांनी ‘लोकमत’कडे केला.

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेthaneठाणे