शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

"डिझेल परताव्याचा दिलेला शब्द मुख्यमंत्री पाळतील का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 04:15 IST

निवडणुकीनंतर वर्ष उलटले : ७ कोटी ४० लाख थकीत देणी देण्याची मागणी

- हितेन नाईक पालघर : लोकसभा निवडणुकीपूर्वी पालघर जिल्ह्यातील सर्व डिझेल परताव्याच्या थकीत रक्कमेचे वाटप केले जाईल, असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मच्छीमार प्रतिनिधींना दिला. मात्र निवडणुका होऊन वर्ष उलटूनही जिल्ह्यातील मच्छीमारांची ७ कोटी ४० लाखांची देणी थकीत आहेत. त्यामुळे तात्काळ या रक्कमेचे वाटप करण्याचे आदेश देत मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळावा, अशी मागणी मच्छीमारांमधून होत आहे.लोकसभा निवडणुकीपूर्वी पालघरमध्ये एप्रिल २०१९ मध्ये आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची जिल्ह्यातील मच्छीमार प्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी पालघरच्या ठाणे जिल्हा मच्छीमार संघाच्या कार्यालयात भेट घेतली होती. त्या भेटीत डिझेल परताव्याची ११० कोटी रुपयांची वर्षभरापासून थकीत असलेली रक्कम मिळावी यासह अनेक प्रलंबित प्रश्नावर उपाययोजना आखण्याची मागणी केली होती. त्या मागणीवर सकारात्मक विचार करून प्रथम डिझेल परताव्याची रक्कम देण्याबाबत तात्काळ कार्यवाही करू, असे आश्वासन देत तुमच्या मागण्यांना न्याय दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास दिला होता. परंतु मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला वर्षभराचा कालावधी उलटून गेल्यानंतर अजूनही परतावा थकीत ठेवण्यात आला आहे.सातपाटीमधील दोन्ही सहकारी संस्थांची वर्षभरापासूनच्या डिझेल परताव्याची थकीत रक्कम दोन कोटीच्या वर पोचली असून जिल्ह्यातील ४५ सहकारी संस्थांची रक्कम सुमारे ७ कोटी ४० लाख रुपयांची असल्याचे संस्था प्रतिनिधींचे म्हणणे आहे.‘आमचेच पैसे, परत मिळण्यात उशीर का?’डिझेल वापराचे सर्व पैसे भरणा करूनही परताव्याचे ‘आमचेच पैसे, आम्हाला मिळण्यात एवढा उशीर का?’ असा प्रश्न मच्छीमार उपस्थित करीत आहेत. या मिळणाऱ्या रकमेतून आम्हाला येणाºया मासळी हंगामासाठी जाळी, बोटींची डागडुजी, कामगारांची अनामत रक्कम देणे आदी गरजा भागवायच्या असल्याचे सर्वोदय संस्थेचे अध्यक्ष पंकज पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे