शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे भाजपला मिळणार का? सांगणार कोण..?

By अजित मांडके | Updated: April 13, 2024 08:22 IST

मागील निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांना ७ लाख ४० हजार ९६९ मते मिळाली होती

अजित मांडकेठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघ २६ वर्षांनंतर शिवसेनेकडून भाजपकडे जाणार, असा दावा भाजपचे नेते करत आहेत. त्याचवेळी ठाण्याची उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत आहे. महायुतीमध्ये असंतोष निर्माण होऊ नये यासाठी शिंदेसेना, भाजपकडून मेळावे घेत उमेदवार कोणीही असो महायुतीला विजयी करण्याच्या आणाभाका घेतल्या जात आहेत. ठाणे गमावले तर शिवसैनिकांमध्ये चुकीचा संदेश जाणार असून पुढे त्याचे पडसाद उलटू शकतात.एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाचे पालन करण्यास  शिवसैनिक तयार आहे. महाराष्ट्रातूनच ४५ पेक्षा जास्त खासदार निवडून आणू, असा शब्द पंतप्रधानांना दिला आहे. त्यात ठाण्याची जागापण आहे. सर्वांत जास्त मताधिक्याने ठाण्यातील उमेदवार निवडून आला पाहिजे, असे शिंदे सेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी लोकमतला सांगितले आहे.

 मागील निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांना ७ लाख ४० हजार ९६९ मते मिळाली होती. तर, राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांना ३ लाख २८,८२४ मते मिळाली होती.  अडीच वर्षांपूर्वी झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर ठाणे लोकसभा मतदारसंघ दोन्ही शिवसेनेसाठी महत्त्वाचा ठरला आहे.  यापूर्वी हा मतदारसंघ १९९६ पर्यंत भाजपच्या ताब्यात होता. दिवंगत आनंद दिघे यांनी खेळलेल्या खेळीमुळे मागील २६ वर्षे हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात होता. भाजपने पुन्हा हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी दावा केला आहे.

 ठाण्याची जागा भाजपला देतो, भाजपने त्यांना पसंत असलेला उमेदवार देत. त्याला आमच्या चिन्हावर लढवा, असा प्रस्ताव शिंदेसेनेनी भाजपला दिला होता पण तो मान्य झाला नाही. ठाण्याची जागा भाजपच्या पारड्यात गेली तर त्याचे परिणाम येत्या काही दिवसांत दिसून येतील. ठाणे लोकसभा भाजपकडे गेली तर माजी खासदार संजीव नाईक यांचे नाव आघाडीवर आहे.  नाईक यांना पुत्राच्या विजयासाठी मतदारसंघात ठाण मांडून बसावे लागेल. नवी मुंबई, मीरा-भाईंदर आणि ठाणे शहर येथे भाजपचे आमदार असून संघटनात्मक ताकद आहे. 

टॅग्स :thane-pcठाणेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाShiv Senaशिवसेना