शहरं
Join us  
Trending Stories
1
मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
2
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
3
"माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
4
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
5
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
7
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
8
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
9
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...
10
दिवाळीला बायकोला द्या स्कूटर गिफ्ट! ८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मिळतायेत बेस्ट पर्याय
11
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
12
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
13
Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती
14
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
15
GST नंतर आता तुमचा EMI स्वस्त होणार? RBI च्या पतधोरण समितीची बैठक आजपासून, रेपो दरात किती कपात
16
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
17
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
18
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
19
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
20
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?

नगरसेवक बैठकीला का गैरहजर राहिले?; नरेश म्हस्के यांचा राष्ट्रवादीला थेट सवाल

By अजित मांडके | Updated: February 4, 2023 15:17 IST

ठाण्यात मागील काही दिवसापासून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाणार असे चित्र निर्माण झाले आहे.

ठाणे : मुंबईत ठाण्यातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांची बैठक अजित पवार यांनी घेतली होती. मात्र या बैठकीला सुमारे १३ माजी नगरसेवक गैरहजर राहिल्याचे दिसून आले. यावरुन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. जो धुर येत आहे, म्हणजे  कुठे तरी आग लागलेली आहे. ती आग का लागली ती लागणार आहे की नाही? याचे उत्तर जितेंद्र आव्हाड यांनी द्यावे. नगरसेवक बैठकीला गेले नाहीत, याचे कारण शोधा असा टोला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी लगावला आहे.

ठाण्यात मागील काही दिवसापासून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाणार असे चित्र निर्माण झाले आहे. तर त्यासाठी अमिष देखील दाखविले जात आहे. परंतु अशा कोणत्याही अमिषाला बळी पडू नका, तुमची फसवणुक केली जाऊ शकते. पुन्हा चांगले दिवस येणार आहात, थोडे दिवस थांबा, पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करा असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ठाण्यातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना दिला. मात्र ज्यांच्यासाठी ही बैठक लावली होती. ते हणमंत जगदाळे, राजण किणो त्यांची पत्नी भाऊ आदींसह सुमारे १३ माजी नगरसेवक बैठकीला गैरहजर राहिल्याचे दिसून आले. त्यामुळे ते आता काय निर्णय घेतात, त्यांची मनधरणी राष्ट्रवादीचे श्रेष्ठी करणार का? अशी चर्चा सुरु आहे. असे असतांनाच आता नरेश म्हस्के यांनी त्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहेत.

अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला १३ नगरसेवक का गैरहजर राहिले याचे उत्तर आव्हाडांनी द्यावे असे त्यांनी सांगितले. नगरसेवकांची नाराजी नेमकी कोणावर हे आता स्पष्ट दिसत आहे. जो धुर येत आहे, म्हणजेच कुठेतरी आग लागलेली आहे. ती आग का लागली याचे उत्तर त्यांनी द्यावे. नगरसेवक का गैरहजर राहिले, याची कारणो शोधो असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस