शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यातच गोळी का झाडली? सीआयडी करणार संजय शिंदेंची चौकशी

By जितेंद्र कालेकर | Updated: September 26, 2024 07:01 IST

मुंब्रा पोलिसांकडून घेतला कागदपत्रांचा ताबा

ठाणे : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आराेपी अक्षय शिंदे याचा कथित पोलिस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) बुधवारी याबाबतची काही कागदपत्रे ताब्यात घेतली. तसेच अक्षयचा पोलिसांवरील हल्ल्याचा प्रयत्न आणि त्याचा गोळीबारात झालेला मृत्यू, अशा दाेन गुन्ह्यांची माहितीही सीआयडीने घेतल्याची माहिती सूत्रांनी  दिली. सीआययूचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षयच्या वर्मी गोळी घालण्याऐवजी त्याला पायावर गोळी घालून जखमी का केले नाही, याचीही चौकशी सीआयडी करणार आहे.

पुणे  सीआयडीचे विशेष पाेलिस महानिरीक्षक सारंग आव्हाड आणि नवी मुंबईच्या काेकण भवन येथील सीआयडीचे अधीक्षक राहुल वाघुंडे यांनी मुंब्रा पाेलिसांकडून संपूर्ण दिवसभर या चकमकीशी संबंधित कागदपत्रे ताब्यात घेतली. त्यांनी मुंब्रा बायपास परिसरास भेट देऊन स्वतंत्रपणे चाैकशी सुरू केली. या भागात वावर असलेल्या स्थानिकांकडून काही माहिती मिळते का? घटनास्थळाजवळ काही पुरावे मिळतात का? या दृष्टीने तपास करण्यात येत आहे.

गुन्हे अन्वेषण विभागाच्या अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा तपशील घेतला जाणार असून, ज्या वाहनामध्ये हा थरार घडला, त्या वाहनाचीही सीआयडी पथक पाहणी करणार आहे.

कथित पाेलिस चकमकीतील अक्षयच्या मृत्यूचे, तसेच त्याने पाेलिसांवर केलेल्या कथित गाेळीबाराचे राज्यभर पडसाद उमटले. यावरून सत्ताधारी आणि विराेधक यांच्यातही आराेप-प्रत्याराेपांच्या फैरी झडत आहेत.

पोलिस अधिकऱ्यांची स्वतंत्र चाैकशी

घटनास्थळाचा पंचनामा, तक्रार दाखल करून घेणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडूनही सीआयडीने माहिती घेतली. तळाेजा कारागृह ते मुंब्रा बायपास या प्रवासात अक्षयला पाेलिस व्हॅनमधून ठाण्याकडे घेऊन जाणारे सीआययूचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक संजय शिंदे, अक्षयच्या गाेळीबारात जखमी झालेले सहायक पाेलिस निरीक्षक नीलेश माेरे यांच्यासह अन्य दाेन अंमलदारांची स्वतंत्र चाैकशी केली जाणार आहे. 

या प्रश्नांची उत्तरे शोधणार

पोलिस अधिकाऱ्याच्या हातातून काेणत्या परिस्थितीत अक्षयने पिस्तूल हिसकावले?, ते लाॅक हाेते का?, माेरे यांच्या पायालाच कशी गोळी लागली?, अक्षयच्या थेट वर्मी गाेळी घालण्याऐवजी शिंदे यांनी त्याच्या पायावर किंवा अन्यत्र गाेळी का झाडली नाही?, अक्षयला केवळ जखमी करण्याचा पर्याय का निवडला नाही?, अशा प्रश्नांची उत्तरे सीआयडी अधिकाऱ्यांना शोधायची असल्याची माहिती एका वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्याने दिली. 

अधिकाऱ्यांकडून खासगीत समर्थन

अक्षयसारखा आराेपी प्रक्षुब्ध झाल्यानंतर त्याच्या गाेळीबारात एखादा अधिकारी मारला जाण्याची वाट पाहायची का, असा सवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खासगीत केला. पिस्तूल साफ करताना पोलिस जखमी हाेण्याच्या  किंवा मृत्यूच्या घटना घडल्याकडे एका अधिकाऱ्याने लक्ष वेधले. 

टॅग्स :badlapurबदलापूरHigh Courtउच्च न्यायालयPoliceपोलिस