शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बजरंगबलीच्या नावाचा निवडणुकीत वापर का?; बागेश्वर महाराजांनी व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 08:20 IST

निवडणुकीत धार्मिक प्रचाराचे महत्त्व वाढले असून, राजकीय व्यक्तींच्या प्रचारासाठी ईश्वराला माध्यम करणे चुकीचे असल्याचे मत बागेश्वर महाराज यांनी व्यक्त केले.

अंबरनाथ : निवडणुकीत धार्मिक प्रचाराचे महत्त्व वाढले असून, राजकीय व्यक्तींच्या प्रचारासाठी ईश्वराला माध्यम करणे चुकीचे असल्याचे मत बागेश्वर महाराज यांनी व्यक्त केले. राजकीय प्रश्नांना बगल देत महाराजांनी निवडणुकीमध्ये बजरंगबलीच्या नावाचा वापर करण्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

अंबरनाथमध्ये बागेश्वर महाराज यांचा तीन दिवसीय हनुमान कथेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी बागेश्वर महाराज यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. 

...ते दिवस विसरणे कठीणच'; मणिपूरमधील महाराष्ट्राचे विद्यार्थी संध्याकाळी मुंबईत दाखल

कर्नाटकमधील बजरंग दलावर बंदी घालण्याच्या विषयावर विचारले असता बजरंग दल ही एक विचारसरणी असून, त्या विचारसरणीला समाजातील काही घटक विरोध करू शकतील. मात्र तेच घटक बजरंगबलीला प्रत्यक्षात विरोध करणार नाही. 

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असून, त्याचाच पुढचा टप्पा आता हिंदू राष्ट्र स्थापन होणे गरजेचे आहे. पूर्वी ईश्वराच्या प्रचारासाठी व्यक्तीचा माध्यम म्हणून वापर केला जात होता. हल्ली ईश्वराला माध्यम करून व्यक्तीचा प्रचार करण्याची प्रथा सुरू झाली आहे. ती प्रथा बंद करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

सर्व धर्माच्या लोकांना महत्त्व

हिंदू राष्ट्रामध्ये इतर धर्माच्या लोकांना तेवढेच महत्त्वाचे स्थान राहणे हीदेखील गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हिंदू राष्ट्राची स्थापना झाल्यास जातीयवादी शक्तींना स्थान राहणार नाही आणि जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होणार नाही. 

हल्ली देवांच्या नावावरच सर्व निवडणुका लढवल्या जातात, मात्र भविष्यात हिंदू राष्ट्राची स्थापना झाल्यास देवाच्या नावावर निवडणूक लढवण्याची गरजच भासणार नाही आणि केवळ विकासाच्या नावावर निवडणूक लढवल्या जातील, अशी भूमिका त्यांनी मांडली. देशात हिंदू बहुसंख्य असताना राम मंदिर उभारण्यासाठी ५० वर्षे वाट का पाहावी लागली, आजही कृष्ण जन्मभूमीबाबत निर्णय घेता येत नाही ही शोकांतिका आहे. सनातन हिंदू धर्म वाचवायचा असेल तर शिक्षणासोबत धार्मिक शिक्षणाचीही गरज त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धाम