शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

निष्काळजीपणा करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या त्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई का नाही? : मनसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 19:33 IST

खेळाचे मैदान सुरक्षित न ठेवणाºया ठाणे महापालिकेच्या त्या अधिकाºयांविरोधात आयुक्त कारवाई का करीत नाही असा सवाल मनविसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देनिष्काळजीपणा करणाऱ्या त्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई का नाही? : मनसेख्रिश्चन धर्मीयांनी अनधिकृतरित्या दफनविधी केल्याची घटना निंदनीयच : संदीप पाचंगेभूखंड अन्य कोणत्याही कारणासाठी वापरला जावू नये

ठाणे: वर्तकनगर येथील खेळाच्या मैदानासाठी असलेल्या आरक्षित भूखंडात काही दिवसांपुर्वी ख्रिश्चन धर्मीयांनी अनधिकृतरित्या दफनविधी केल्याची घटना घडली होती. सदर बाब ही निंदनीयच आहे. परंतू तेवढीच चूक ही त्या जागेबाबत निष्काळजीपणा बाळगणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांची देखील आहे. या अधिकाºयांविरोधात महापालिका प्रशासन कोणती कारवाई करणार?असा सवाल मनसेने आपल्या निवेदनातून उपस्थित केला आहे.           ठाणे शहरातील वर्तकनगर येथे खेळाचे मैदानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडात ख्रिश्चन धर्र्मियांनी अनधिकृतरित्या दफनविधी केल्यामुळे परिसरातील सामाजिक वातावरण दूषित झाले आहे असा आरोप मनविसे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केला. या घटनेत संबंधितांविरोधात गुन्हा देखील दाखल झाला आहे. या जागेचा टी.डी.आर. हिरानंदानी विकासकाला मिळाल्यामुळे खेळाचे मैदान ठा.म.पा. च्या मालकीचे आहे. त्यामुळे सदर जागेची देखभाल करणे, त्या जागेभोवती कुंपण घालून त्याची काळजी घेणे हे पालिकेच्या संबंधित अधिकाºयांचे कर्तव्य आहे. पालिका अधिकाºयांच्या या निष्काळजीपणामुळे आज दफनविधी सारखा भयंकर प्रकार घडला आहे, ज्या अधिकाºयांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे ते देखील दफनविधी करणाºया एवढेच दोषी आहेत असे पाचंगे म्हणाले. तत्कालीन महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी ३० डिसेंबर २०१६ रोजी ख्रिश्चन धर्मीयांना लेखी पत्राद्वारे ३० हजार चौ. फूट क्षेत्र स्मशानभूमी करीता देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता करण्यास संबंधित अधिकारी वर्ग, श्रेय घेण्यासाठी पुढे पुढे करणारे लोकप्रतिनिधी अकार्यक्षम ठरले आहेत. सर्व धर्मीयांना अंत्यविधी करिता जागा उपलब्ध करून देणे महापालिकेचे कर्तव्य आहे. दोन्ही समाजात संघर्ष होणार नाही याची काळजी पालिका आयुक्तांनी घेऊन कर्तव्यात कसूर करणाºया अधिकाºयांवर निलंबनाची कारवाई करावी व खेळाचे मैदान म्हणून आरक्षित असलेला भूखंड अन्य कोणत्याही कारणासाठी वापरला जावू नये अशी मागणी मनविसेने पालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.

 

 

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेMumbaiमुंबई