शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

 उल्हासनगर गोलमैदानातील योगाकेंद्र व हॉलीबॉल केंद्र कोणाचे? महापालिकेकडे ताबाच नाही

By सदानंद नाईक | Updated: July 5, 2023 18:49 IST

 उल्हासनगरच्या मधोमध गोलमैदान असून हा परिसर शहराची धडकन समजले जाते.

उल्हासनगर: शहरातील मधोमध असलेले गोलमैदान हरितपट्ट्यात असतांना, मैदानात विविध निधीतून योगाकेंद्र, हॉलीबॉल केंद्र, मिडटॉउनचे बांधकाम उभे राहिले. मात्र योगाकेंद्र व हॉलीबॉल केंद्राचा ताबा महापालिकेकडे नसल्याने, केंद्र ताब्यात कोणाचे असे प्रश्न उभे राहिले आहे.

 उल्हासनगरच्या मधोमध गोलमैदान असून हा परिसर शहराची धडकन समजले जाते. तसेच गोलमैदान हरितपट्ट्यात येत असल्याने, त्यामध्ये सिमेंट काँक्रीटचे बांधकाम करता येत नाही. असे असतांना गोलमैदानात सिमेंट काँक्रीटचे बांधकाम झाले आहे. गोलमैदान हे योगाकेंद्र, मिडटॉउन, ब्राह्मकुमारी केंद्र, महापालिका प्रभाग कार्यालय, सभामैदान व उद्यान आदी विभागात विभागले असल्याने, मैदानाचा खरा चेहरा कधीच हरविल्याची टीका पर्यावरण प्रेमीकडून होत आहे. मिडटॉउन शेजारी आमदार कुमार आयलानी यांच्या २ कोटीच्या आमदार निधीतून योगाकेंद्र उभारले असून बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते योगाकेंद्राचे उदघाटन झाले. मात्र अद्यापही योगाकेंद्र महापालिकेकडे हस्तांतरण झाले नसतांना योगाकेंद्र चालविते कोण? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

 महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी योगाकेंद्राचा ताबा अद्यापही महापालिकेकडे हस्तांतरीत झाला नसल्याचे सांगून केंद्रांची चाबीही पालिकेकडे नसल्याची माहिती दिली आहे. महापालिका मालमत्ता विभागाच्या व्यवस्थापिका अलका पवार यांनी योगाकेंद्राचा ताबा महापालिकेकडे आला नसल्याचे सांगून, त्याबाबत पत्रव्यवहार करीत असल्याचे सांगितले. तर आमदार कुमार आयलानी यांनी योगाकेंद्राचा चाबी पालिकेला दिल्याची माहिती दिली. याप्रकारामुळे गोलमैदानात उभारलेल्या योगाकेंद्राचा ताबा नेमका कोणाकडे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित राहिला आहे. योगाकेंद्रा प्रमाणे शेजारील हॉलीबॉल केंद्राचा ताबाही महापालिकेकडे नसल्याचे उघड झाले. महापालिकेची मालमत्तेचा उपयोग कोण करतो? याची माहिती महापालिकेला नसल्याने, महापालिका कारभारावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे.   महापालिका समाजमंदिर ताब्यात घ्या...आयुक्त अजीज शेख यांचे आदेश महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी शहरात १३३ समाजमंदिरे बांधली आहेत. मात्र बहुतांश समाजमंदिरावर माजी नगरसेवक व समाजसेवी संस्थेचा ताबा असल्याच्या असंख्य तक्रारी असून त्यामध्ये विनापरवाना उपक्रम होत आहेत. मंगळवारी झालेल्या बैठकीत आयुक्त अजीज शेख यांनी समाजमंदिर ताब्यात घेवून अहवाल सादर करण्यास मालमत्ता विभागाला आदेश दिले. मालमत्ता विभागाच्या व्यवस्थापिका अलका पवार यांनी याबाबत प्रभाग अधिकाऱ्यांना समाजमंदिर ताब्यात घेऊन अहवाल सादर करण्यासाठी नोटिसा काढल्या आहेत. तशी माहिती अलका पवार यांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर