शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

भिवंडीत डाइंग सायजिंगना आशीर्वाद कोणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 23:16 IST

शहरात असलेल्या डाईंग कंपन्यांमध्ये कापडावर प्रक्रिया करण्यासाठी बॉयलरमध्ये केमिकल अ‍ॅसिड असलेल्या पाण्याचा वापर केला जातो.

- नितीन पंडित, भिवंडीशहरात असलेल्या डाईंग कंपन्यांमध्ये कापडावर प्रक्रिया करण्यासाठी बॉयलरमध्ये केमिकल अ‍ॅसिड असलेल्या पाण्याचा वापर केला जातो. डाइंग कंपन्यांमध्ये तयार होणारा कार्बन डायऑक्साइड हा वायू चिमण्यांद्वारे (धुरांडी) हवेत सोडला जातो. सरकारी नियमानुसार या चिमण्यांची उंची ९० ते १२० फूट असणे आवश्यक आहे; मात्र येथील चिमण्यांची उंची फक्त ७० ते ८० फूट असल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर कंपन्यांमध्ये असलेल्या बॉयलरमध्ये कोळसा टाकणे आवश्यक असताना काही डाइंग कंपन्या आर्थिक बचतीसाठी कोळशाऐवजी लाकूड वापरतात. लाकूड नीट जळत नसल्याने धुरातून काळे तंतू तयार होतात. हे तंतूमुळे त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. डाइंग कंपन्यांमध्ये कापडावर रंगाची प्रक्रिया करण्यासाठी रासायनिक अ‍ॅसिडचा वापर केला जातो. प्रक्रियेनंतर हे अ‍ॅसिडयुक्त गरम पाणी थेट गटार-नाल्यांमध्ये सोडले जाते. तसेच, बॉयलरचे तापमान तपासणीसाठी तज्ज्ञ बॉयलर आॅपरेटरची आवश्यकता असते. काही ठिकाणी तज्ज्ञ आॅपरेटर नसतात. हे कामही कामगार किंवा बिगारी करतात. यामुळे बॉयलरचा स्फोट होण्याच्या अनेक घटना घडून अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. आगीच्याही घटना घडल्या आहेत.नदी-खाडीकिनारी असलेल्या डाइंग कंपन्यांचे पाणी थेट खाडी किंवा नदीत सोडले जात असल्यामुळे त्याचा त्रास किनाऱ्यावरील गावातील ग्रामस्थांना होत आहे. प्रदूषण करणाºया डाइंग कारखान्यांवर शहर परिसरात भिवंडी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने ग्रामीण भागात स्थानिक ग्रामपंचायतींनी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाने कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, आर्थिक हितसंबंधांमुळे ते त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता नागरिक करत आहेत. डाइंग कंपन्यांमधून केमिकलमिश्रित धूर वातावरणात सोडल्याने मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण आणि केमिकलमिश्रित प्रदूषित पाणी थेट नदीपात्रात सोडल्याने जलप्रदूषणाची समस्या गंभीर होत चालली आहे. ज्याचा थेट दुष्परिणाम स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यातच येथील अनेक डाइंग कंपन्या अनधिकृत थाटल्या असल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक नेते पुढारी तसेच शासकीय तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व ग्रामीण भागात ग्रामपंचायतींना हाताशी धरून ‘ना हरकत’ दाखल्यावर अनेक डाइंग कंपन्या उभारल्या आहेत.त्यातच डाइंगमालक व शासकीय अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण संबंधाने या बेकायदा डाइंग कंपन्यांवर आतापर्यंत कोणतीही कारवाई होत नसल्याची बाबही समोर येत आहे. त्यामुळे प्रदूषण करणाºया या कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. मात्र, संबंधित यंत्रणांचे अधिकारी आणि कंपनीमालकांचे हितसंबंध कारवाईच्या आड येत असावेत, अशी चर्चा सुरू आहे.भिवंडी-पारोळ रोडवरील खेमिसती प्रोसेस या डाइंग कंपनीसमोर शालेय विद्यार्थी अंकित गुप्ता (१३) शनिवारी अपघाती मृत्यू झाला. डाइंग कंपन्यांसमोर रस्त्यावरच उभ्या राहणाºया वाहनांमुळे ही दुर्घटना घडली. नदीनाका येथील जीवनज्योती हिंदी हायस्कूल आहे. या शाळेत अंकित इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत होता. शाळा सुटल्यानंतर तो मित्रांसोबत घरी पायी निघाला होता. खेमिसती डाइंगसमोर पाण्याचे टॅँकर नेहमीच उभे असतात. हे टॅँकर कंपनीला पाणीपुरवठा करतात. भिवंडीतील डाइंग आणि सायजिंगमुळे अगोदरच प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतानाच बेकायदा पार्किंगचा गंभीर प्रश्न या घटनेनंतर समोर आला आहे. त्यामुळे शहरातील डाइंग सायजिंग कंपन्यांना नेमका आशीर्वाद तरी कुणाचा आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.