शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

ठामपाच्या फाटक्या झोळीला घाऊक लसीकरण अशक्य, आर्थिक दुर्बलतेमुळे ग्लोबल टेंडर अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 09:52 IST

शेजारील मुंबई महापालिका मुंबईकरांना लस देण्यासाठी ग्लोबल टेंडर काढत आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नवी मुंबई महापालिकेने ग्लोबल टेंडर काढण्याची तयारी सुरू केली आहे.

अजित मांडके -  ठाणे  : मुंबई महापालिका आपल्या क्षेत्रातील नागरिकांच्या लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर मागवत असताना शेजारील ठाणे महापालिकेची आर्थिक अवस्था अंत्यत दयनीय असल्याने ठाणेकरांच्या नशिबी मोठ्या प्रमाणावर लस खरेदी करून सुरक्षित होण्याचा योग नाही. कोरोनामुळे महापालिकेचे उत्पन्न घटल्याने दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाले आहे. गतवर्षी कोरोनावर मात करण्यासाठी फिक्स डिपॉझिटमधील २४० कोटी रुपये खर्च केले असल्याने गंगाजळी पूर्ण आटली आहे. कर्ज काढून ठाणेकरांसाठी घाऊक लस खरेदी करायची तर आर्थिक पत ढासळल्याने कुणी कर्ज देईल, अशी स्थिती नाही. त्यामुळे मुंबईकरांना उपलब्ध होईल तशी मुबलक लस उपलब्ध करून देऊन ठाणेकरांचे लसीकरण करणे  महापालिकेला शक्य नाही.  शेजारील मुंबई महापालिका मुंबईकरांना लस देण्यासाठी ग्लोबल टेंडर काढत आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नवी मुंबई महापालिकेने ग्लोबल टेंडर काढण्याची तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिकेकडे पीएफ, पेन्शन, कंत्राटदराकडून मिळणारी सुरक्षा अनामत रक्कम अशा स्वरूपात ७५ हजार कोटी शिल्लक आहेत. मुंबई महापालिका आपल्या क्षेत्रातील एक कोटी ४० लाख नागरिकांच्या लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढत आहे. परंतु ३० लाख लोकसंख्येच्या ठाण्याची लसींची गरज भागविण्याची ऐपत ठाणे महापालिकेत नसल्याची धक्कादायक व संतापजनक बाब उघड झाली आहे.      मागील वर्षी कोरोनाचे सावट असतानाही करदात्या ठाणेकरांनी महापालिकेच्या हाकेला साद घालत  तिजोरीत दोन हजार कोटींच्या आसपास उत्पन्न जमा केले होते. परंतु अपेक्षित उत्पन्न पालिकेला मिळाले  नाही.  ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर करताना महसुली खर्चावर नियंत्रण ठेवताना भांडवली खर्चाची स्वीकारलेली कामे पूर्ण करण्यावर भर दिला. त्यानुसार महसुली खर्चासाठी १८१९ कोटी ६१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून भांडवली खर्चासाठी ९३५ कोटी  ३७ लाखांची तरतूद प्रस्तावित केली आहे. स्थायी समितीने हा अर्थसंकल्प फुगविल्याने पुन्हा उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ विस्कटला आहे.महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आल्याने त्यापोटी पालिकेच्या तिजोरीवर दरवर्षी १०४ कोटींच्या वर आर्थिक बोजा पडणार आहे. मागील वर्षीपासून कोरोनाचे सावट असल्याने त्यावर आतापर्यंत पालिकेच्या माध्यमातून १३० कोटींचा खर्च करण्यात आला असून कोरोनाकाळातील ३२१ कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार ७५ कोटी, पेन्शन आदींचा बोजाही पालिकेच्या तिजोरीवर आहे. महापालिकेला शासनाकडून जीएसटीच्या अनुदानापोटी दरमहा ७५ कोटी  मिळत असून त्यातूनच सध्या महापालिका कर्मचाऱ्यांचा पगार दिला जात आहे. 

फिक्स डिपाॅझिटमध्ये दमडीही नाहीउत्पन्नावर मोठा परिणाम झाल्याने ठाणे महानगरपालिकेने मागील वर्षी कोरोनाचा सामना करण्यासाठी फिक्स डिपॉझिटमध्ये असलेले २४० कोटी रुपये खर्च केले. त्यामुळे महानगरपालिकेच्या फिक्स डिपॉझिटमध्ये सध्या रुपयाही जमा नसून, दुसरीकडे एमएमआरडीएचे पालिकेच्या डोक्यावर ६५ कोटींचे कर्ज आहे. 

उत्पन्न घटल्याने अगोदर घेतलेल्या कर्जावरील व्याज आणि त्याचे हप्ते भरण्याची ऐपत पालिकेची नाही. त्यामुळे नवीन कर्ज काढून लस खरेदी करणे अशक्य आहे. त्यामुळे ३० लाख लोकसंख्या असलेल्या ठाणेकरांचे झटपट लसीकरण करण्याची पालिकेची क्षमता नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका