शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी सभापतीपदाचा मान कुणाला?, जानेवारीत निवडणूक अपेक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 01:09 IST

केडीएमसीच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होणे अपेक्षित आहे.

कल्याण : केडीएमसीच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होणे अपेक्षित आहे. सभापतीपदाची धुरा कोणाकडे सोपवायची, याचा निर्णय शिवसेनेतील पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. मात्र, सभापतीपद पुन्हा डोंबिवली की कल्याण पश्चिमेकडे जाणार? तसे झाल्यास कल्याण पूर्वेवर अन्याय होणार का? असे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लढवले जात आहेत. या वेळेस कल्याण पूर्वेला न्याय मिळावा, अशी अपेक्षा तेथील नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.२०१५ मधील महापालिका निवडणुकीनंतर भाजपाला दोन वर्षे, तर शिवसेनेला तीन वर्षे स्थायी समितीचे सभापतीपद दिले जाईल, असा अलिखित करार शिवसेना-भाजपामध्ये झाला होता. मात्र, त्याला पक्षश्रेष्ठींकडून आजघडीला दुजोरा दिला जात नाही. पहिल्या वर्षी भाजपाचे संदीप गायकर, त्यानंतर शिवसेनेचे रमेश म्हात्रे, तर तिसऱ्या वर्षी भाजपाचे राहुल दामले यांना स्थायी समिती सभापतीपद दिले गेले. आता पुन्हा शिवसेनेकडून सभापतीपदावर दावा केला जात आहे. कल्याण पूर्वेतील निलेश शिंदे व महेश गायकवाड हे सदस्य या पदासाठी इच्छुक आहेत. कल्याण पूर्वेतील ज्येष्ठ नगरसेवक मल्लेश शेट्टी यांना स्थायी समिती सदस्यपद न दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे कल्याण पश्चिमेतील नगरसेवक जयवंत भोईर आणि गणेश कोट यांचीही नावे सभापतीपदासाठी चर्चेत आहे.डोंबिवली शहरातून ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे, तरुण नगरसेवक दीपेश म्हात्रे हे देखील सभापतीपदासाठी शर्यतीत आहेत. या दोघांनीही यापूर्वी सभापतीपद भूषवले आहे. आगामी निवडणुका विचारात घेता पक्षाकडून या दोन्ही नावांचा पुन्हा विचार केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.सगळ्या इच्छुकांच्या मर्जीचा विचार करून कोणाला एकाला सभापतीपद देणे, हे पक्षासाठी तारेवरची कसरत ठरणार आहे.>लोकसभेसाठी कल्याण पूर्वेला न्याय?केडीएमसीतील विविध समित्यांची पदे कल्याण पश्चिम व डोंबिवलीला दिली जातात, अशी कुरबूर नेहमीच पक्षांतर्गत ऐकायला मिळते. कल्याण पूर्वेला न्याय दिला जात नाही, अशी तेथील नगरसेवक, पदाधिकाºयांची तक्रार असते.कल्याण पूर्वेतील अपक्ष आमदार गणपत गायकवाड हे भाजपाच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत तेथील मते मिळवून आपले पारडे जड करण्यासाठी शिवसेनेकडून स्थायी समितीचे सभापतीपद कल्याण पूर्वेला दिले जाऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका