शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडीओ व्हायरल केले कुणी? पोलिस, गुन्हे शाखेचे कानावर हात

By सदानंद नाईक | Updated: February 8, 2024 10:12 IST

फुटेज दुसऱ्या दिवशी व्हायरल झाले.

सदानंद नाईकलोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : हिललाइन पोलिस ठाण्यातील गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याबाबत हिललाइन पोलिस व गुन्हे अन्वेषण विभागाने कानावर हात ठेवले. आम्ही हे फुटेज व्हायरल केले नसल्याचे  दोन्ही विभागांनी लोकमतला सांगितले. त्यामुळे व्हिडीओ व्हायरल केले कुणी, हा प्रश्न अनुत्तरित आहे.उल्हासनगरच्या हिललाइन पोलिस ठाण्यातील आमदार गणपत गायकवाड यांच्या अंदाधुंद गोळीबाराचे पहिले सीसीटीव्ही फुटेज दुसऱ्या दिवशी व्हायरल झाले.

आमदारांचा मुलगा वैभव गायकवाड याला वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनबाहेर झालेल्या धक्काबुक्कीचे सीसीटीव्ही फुटेज त्यानंतर व्हायरल झाले. त्यानंतर मंगळवारी गोळीबाराचे ११ मिनिटांचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्थानिक पोलिस ठाण्याचे नियंत्रण असते. अशा वेळी या महत्त्वाच्या तपासातील सीसीटीव्ही फुटेज एकापाठोपाठ एक सोशल मीडियावर व्हायरल कोण करते, असा प्रश्न उपस्थित होऊन पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

फुटेज तपास अधिकाऱ्याकडे हिललाइन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप यांना विचारले असता, त्यांनी गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज तपास अधिकाऱ्याकडे असल्याचे सांगितले. आम्ही फुटेज व्हायरल केलेले नाही, असे जगताप म्हणाले. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त व या प्रकरणातील प्रमुख तपास अधिकारी शिवाजी पाटील यांनीही गोळीबाराच्या व्हायरल सीसीटीव्ही फुटेजबाबत कानावर हात ठेवले. 

गायकवाड कुटुंबालान बोलण्याचे आदेश? गोळीबारानंतर वैभव गायकवाड फरार आहे. भाऊ अभिमन्यू यांचा मोबाइल बंद आहे. आमदारांचे पीए राऊत हेही बोलू इच्छित नाही. पक्षाच्या नेत्यांनी १४ फेब्रुवारीपर्यंत मीडियाला कोणतीही प्रतिक्रिया देण्यास मनाई केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

गिरगावातील चौकाला मराठा समाजाचे दिवंगत नेते ॲडव्होकेट शशिकांत उर्फ आप्पासाहेब पवार यांचे नाव देण्याचा सोहळा ‘लोकमत समूहा’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांच्या हस्ते झाला. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार, काँग्रेसचे आमदार भाई जगताप, वीरेंद्र पवार व इतर मान्यवर उपस्थित होते. (छाया : दत्ता खेडेकर )

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस