शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

शिवसेनेत नेमका गद्दार कोण?; केडीएमसीच्या स्थायी समितीत पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 01:05 IST

राज्यातील महाविकास आघाडीमुळे महापालिकेत शिवसेना व भाजपने फारकत घेतली आहे. त्यात कोट यांचा पराभव झाल्याने शिवसेनेचे चार सदस्य व एक अपक्ष यांच्यासह पाच सदस्यांनी त्यांची जागा विरोधी सदस्य बसतात,

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे हे प्रकृती ठीक नसल्याने गैरहजर राहिले होते. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार गणेश कोट यांचा पराभव झाला होता. त्यापार्श्वभूमीवर शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत शिवसेनेतील गद्दार कोण, या प्रश्नाचे पडसाद उमटले.

कोट यांच्या पराभवानंतर शुक्रवारी प्रथमच स्थायी समिती सभा झाली. भाजपचे नवनियुक्त स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांची ही पहिलीच सभा होती. मात्र, गटनेत्यांची सातव्या आयोगाच्या मंजुरीसंदर्भात महापौर दालनात आयुक्तांसोबत बैठक सुरू असल्याने स्थायी समितीची सभा सुरू होण्यास एक तासाचा विलंब झाला. सभा सुरू होण्यापूर्वी सर्वप्रथम कोट येऊन बसले होते. ते त्यांच्या पराभवाला कारणीभूत असलेल्या वामन म्हात्रे यांची वाट पाहत होते. सभापती येताच सभा सुरू झाली. त्यावेळी सभापती व सदस्यांचे उपायुक्त मारुती खोडके यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

राज्यातील महाविकास आघाडीमुळे महापालिकेत शिवसेना व भाजपने फारकत घेतली आहे. त्यात कोट यांचा पराभव झाल्याने शिवसेनेचे चार सदस्य व एक अपक्ष यांच्यासह पाच सदस्यांनी त्यांची जागा विरोधी सदस्य बसतात, त्या दिशेला ठरविली. मात्र, कोट यांनी वामन म्हात्रे यांना उद्देशून गद्दाराला बाजूला बसवा, असे वक्तव्य केले. त्यावेळी वामन म्हात्रे यांनी महापालिकेत सगळेच गद्दार आहेत, असे बोलून कोट यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले. यावेळी वाद होण्याची शक्यता लक्षात घेऊन सभापती म्हात्रे यांनी दोघांनाही शांत राहण्याचे आवाहन केले.पत्रकारांशी बोलताना गणेश कोट म्हणाले की, वामन म्हात्रे यांच्या गैरहजेरीमुळे माझा पराभव झाला. पक्षाने त्यांच्यावर अद्याप कारवाई केली नाही. पक्षाने त्यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी पुन्हा मी मागणी केली. वामन म्हात्रे म्हणाले की, मी २५ वर्षांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ आहे. माझी प्रकृती ठीक नसल्याने मी निवडणुकीस गैरहजर राहणार आहे, याची पूर्वकल्पना पक्षाला दिली होती. मी गद्दारी केलेली नाही. याउलट, कोट यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे. यापूर्वी त्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पुन्हा २०१५ च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे गद्दार मी का ते, असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना