शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

असाच हा गिळायचा हुंदका...

By admin | Updated: August 14, 2016 03:52 IST

पप्पा, तुम्ही घरी कधी येणार? तुम्हाला इथं जेवायला देतात? तुम्ही लवकर घरी आला नाहीत, तर मी तुमच्याशी बोलणार नाही...डोळ्यांतून घळाघळा अश्रू पाझरत आहेत आणि निरागस

- प्रज्ञा म्हात्रे,  ठाणे

पप्पा, तुम्ही घरी कधी येणार? तुम्हाला इथं जेवायला देतात? तुम्ही लवकर घरी आला नाहीत, तर मी तुमच्याशी बोलणार नाही...डोळ्यांतून घळाघळा अश्रू पाझरत आहेत आणि निरागस प्रश्नांची सरबत्ती सुरू आहे... पप्पानंही आपल्या सानुलीला उराशी घट्ट कवटाळून तोही अश्रू ढाळत आहे... अन् या स्निग्ध नात्यांचा घट्ट बंध ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या काळ्याकभिन्न भिंती निर्विकारपणे डोळ्यांत साठवत आहेत, अशी अनुभूती शनिवारी तेथे हजर असलेल्यांना आली. निमित्त होते ते शिक्षेतले बंदी आणि त्यांच्या नातेवाइकांच्या गळाभेट कार्यक्रमाचे. आपल्या वडिलांना १६ महिन्यांनी भेटायला आलेल्या पाच-सहा वर्षांच्या चिमुकलीचे डोळे वडिलांना पाहताच पाणावले. तिचा पप्पाही तिला पाहताच दोन्ही हात पसरून उभा होता. वाऱ्याच्या वेगानं जाऊन तिनं आपल्या पित्याला घट्ट मिठी मारली. मुलीला भेटल्यानं वडिलांच्या चेहऱ्यावरही हास्य फुललं होतं. दुसऱ्या एक मुलीनं आपल्या वडिलांना पहिल्यांदाच बंदीच्या गणवेशात पाहिल्यानं तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. वडिलांकडे ती एकटक पाहत होती. काय बोलावं, कसं बोलावं, या विचारांचा घोळ तिच्या डोक्यात सतत चालू होता. वडील तिची विचारपूस करीत होते. तिचे डोळे मात्र अश्रूंनी डबडबले होते. आपल्या या लाडक्या चिमुकलीला मांडीवर घेऊन वडिलांनी घट्ट मिठी मारली आणि ते तिचे सारखे पापे घेत होते. मग, हळूहळू तिची कळी खुलली. ती शाळेतल्या गमतीजमती सांगू लागली. आज वडिलांना भेटायला जायचे, असं समजल्यापासून ती खूप आनंदी होती. सकाळपासून ‘पप्पांना भेटायला कधी जायचं’ असं ती सतत विचारत होती, असं तिच्यासोबत आलेल्या नातलगांनी सांगितलं. वाडा येथून दोन चिमुरड्या आपल्या वडिलांना भेटण्यासाठी आपल्या आईसोबत आल्या होत्या. तीन महिन्यांनी त्या वडिलांना भेटत होत्या. वडिलांना पाहिल्यावर या मुलींच्या आनंदाला पारावार उरला नाही. एक मुलगीआपल्या वडिलांना शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेलं भाषण म्हणून दाखवत होती, तर दुसरी शाळेत कायकाय शिकवतात, ते आपल्या वडिलांच्या मांडीवर बसून सांगत होती. पप्पा तुम्ही घरी चला, असा निरागस तगादा या चिमुरडीने लावला होता आणि त्यांचे वडील आपल्याला लागलीच येथून येणं शक्य नाही, अशी समजूत काढत होते.पप्पांना भेटून खूप आनंद झाला. आमचे वडील लवकर घरी यावे, अशी आम्ही रोज देवापुढं प्रार्थना करतो, असं त्या दोघी सांगत होत्या. पप्पा, आमच्याशिवाय तुम्हाला इथं कसं करमतं, असा सवाल एकीनं करताच पप्पांच्या डोळ्यांतही पाणी आलं. भेटीची वेळ संपली... पोलिसाच्या मागोमाग त्यांचे पप्पा जायला उठले. त्या चिमुकल्यांनी ‘पप्पा...’ अशी आर्त हाक घातली. कारागृहाच्या त्या निर्जीव भिंतींना ती हाक ऐकू आली की नाही, कुणास ठाऊक, पण पाठमोऱ्या पप्पानं ती ऐकली आणि तो आपले अश्रू लपवत काळोख्या कोेठडीत गडप झाला... आई, पप्पा आपल्याबरोबर का नाही आले... ते घरी कधी येणार... या मुसमुसत्या स्वरातील प्रश्नांना त्या माऊलीकडंही उत्तर नव्हतं. तिचेही डोळेही विरहानं झरत होते... पुणे येथील येरवडा तुरुंगातील पक्क्या कैद्यांच्या अलीकडेच झालेल्या गळाभेट कार्यक्रमानंतर ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातही शनिवारी प्रथमच गळाभेटीचा कार्यक्रम पार पडला. यापूर्वी शिक्षेतील बंदींना नातेवाईक भेटण्यासाठी येत होते. परंतु, त्यावेळी भेटीला आलेली चिमुकली आपल्या पप्पाला काचेच्या किंवा जाळीच्या पलीकडून भेटत असे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम सुरू झाला.वडिलांना आज भेटायला जायचं, असं जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. घरी रोज यांची आठवण काढून दोघी ढसाढसा रडत असतात. त्यांचे खाण्यापिण्याकडेही लक्ष नसते. पप्पांना कधी भेटायला जायचं, हे विचारून मला भंडावून सोडतात, असं त्या चिमुकल्यांची आई सांगत असताना तिचा कंठ दाटून आला.