शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिथे आपली शाखा नाही, तिथे मनसेचा नाका हवा! जनसंपर्कवाढीवर राज ठाकरेंचा भर; लवकरच कार्यशाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 13:27 IST

साधारण १५ ते २० मिनिटे चाललेल्या बैठकीत ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना शिस्तीचे धडेही दिले. प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी माझ्यासाठी समान आहे.

डोंबिवली : जनसंपर्क दांडगा असेल तर कोणासमोर हात जोडायची तसेच पसरायची वेळ येणार नाही. शाखांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढलाच पाहिजे. पण जिथे शाखा नाही तिथे जनसंपर्कवाढीसाठी मनसेचा नाका हवा, असा मोलाचा सल्ला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाकरे सोमवारी डोंबिवली दौऱ्यावर आले होते. सर्वेश सभागृह येथे कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील आमदारांपासून ते शाखा अध्यक्ष अशा सर्व पदाधिकाऱ्यांची ठाकरे यांनी विशेष बैठक घेत त्यांना मार्गदर्शन केेले. साधारण १५ ते २० मिनिटे चाललेल्या बैठकीत ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना शिस्तीचे धडेही दिले. प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी माझ्यासाठी समान आहे. 

आपापसातील हेवेदावे पक्षाच्या बाहेर ठेवा. ते खपवून घेतले जाणार नाहीत, असेही त्यांनी सुनावले. कुठल्या पदाची काय काय कामे आहेत याबाबत ठाकरे यांच्याकडून काही पदाधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली. संबंधितांना योग्य प्रकारे उत्तर देता आले नाही. यावर कुठल्या पदाची कोणती जबाबदारी आहे, याबाबतही लवकरच पक्षाच्या वतीने कार्यशाळा घेतली जाईल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुढेही पक्षाकडून कार्यक्रम आखून जनसंपर्कवाढीवर भर दिला जाणार असल्याचेही त्यांच्याकडून लक्ष वेधले गेले. दरम्यान, या एकूणच बैठकीबाबत मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांच्याशी संपर्क साधला असता पदाधिकाऱ्यांची संबंधित बैठक गोपनीय होती. त्यामुळे मला त्याबाबत भाष्य करता येणार नाही, मात्र राजसाहेबांनी केलेले मार्गदर्शन आम्हा प्रत्येक पदाधिकाऱ्यासाठी मोलाचे असून, पुढील वाटचालीत ते हिताचे ठरेल, असे घरत म्हणाले.  

२०० कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेशडोंबिवली विधानसभा, दिवा येथील काही राजकीय पक्षांतील २०० कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. यावेळी आमदार तथा नेते राजू पाटील, अविनाश अभ्यंकर, अविनाश जाधव, मनोज घरत, प्रकाश भोईर, सरोज भोईर आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

रोज रोज नाही... -   शुक्रवारी, शनिवार, रविवार आणि सोमवार असे चार दिवस ठाकरे ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. -   मीरा-भाईंदर, अंबरनाथ आणि कल्याणमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे कौतुक केले. -   तर भाजपला खडेबोल सुनावले होते. -   ठाकरे यांच्या वक्तव्यावर भाजप नेत्यांनीही टोले लगावले होते. -   दरम्यान, सोमवारी डोंबिवलीत पत्रकारांशी ठाकरे संवाद साधतील, अशी माहिती पक्षाकडून दिली गेली होती. -   पाऊण तासात डोंबिवली दौरा आटपून निघणाऱ्या ठाकरे यांना संवादासाठी पत्रकारांनी घेरले असता ‘रोज रोज नाही’ असे बोलत त्यांनी तेथून नवी मुंबईकडे प्रयाण केले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना