शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

पप्पु कलानी नेमके कुठे? उपमुख्यमंत्री पवार यांची भेट टाळणारे कलानी खासदार श्रीकांत शिंदेंच्या गाडीत

By सदानंद नाईक | Updated: January 8, 2024 17:45 IST

Pappu Kalani News: उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या विकास कामाच्या लोकार्पण कार्यक्रमाला जाणे टाळणारे माजी आमदार पप्पु कलानी हे त्याचं दिवसी रात्री खासदार श्रीकांत शिंदे यांच्या गाडीत बसून निघून गेल्याने, विविध चर्चेला उधाण आले.

- सदानंद नाईक उल्हासनगर : उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या विकास कामाच्या लोकार्पण कार्यक्रमाला जाणे टाळणारे माजी आमदार पप्पु कलानी हे त्याचं दिवसी रात्री खासदार श्रीकांत शिंदे यांच्या गाडीत बसून निघून गेल्याने, विविध चर्चेला उधाण आले. शहर विकासासाठी निधी मिळण्यासाठी कलानी मुख्यमंत्री पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या गाडीत गेल्याची माहिती कलानी यांचे कट्टर समर्थक कमलेश निकम यांनी दिली आहे.

उल्हासनगर पूर्वेतील विकास कामाचे लोकार्पण करण्यासाठी रविवारी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे माजी आमदार पप्पु कलानी यांच्या समर्थकांनी बिर्ला गेट येथे सकाळी जंगी स्वागत केले. मात्र पप्पु कलानी, ओमी कलानी व पंचम कलानी यांनी पवार यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचे टाळले. त्याच दिवशी रात्री शहरातील एका स्थानिक नेत्यांच्या मुलांच्या लग्नात मुख्यमंत्री पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी माजी आमदार पप्पु कलानी हे समर्थकासह लग्नात उपस्थित होते. लग्न समारोह संपन्न झाल्यावर पप्पु कलानी हे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या गाडीत बसून निघून गेले. खासदार शिंदे यांच्या गाडीत कलानी बसून निघून गेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर विविध चर्चेला उधाण आले.

शहरातील राजकारण गेल्या ४ दशका पासून माजी आमदार पप्पु कलानी यांच्या भोवती फिरत असून बहुतांश राजकीय पक्षाच्या नेत्यांनी महापालिका सत्तेसाठी कलानी यांच्या घराचे उंबरठे झिजविले आहे. कलानी यांचा पाठिंबा ज्या पक्षाला असेल त्याचा विजय निश्चित मानला जातो. कल्याण लोकसभेसह उल्हासनगर, कल्याण पूर्व व अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात कलानी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. उल्हासनगर महापालिका ताब्यात घेण्यासाठी कलानी शिवाय कोणत्याच पक्षाला पर्याय नाही. त्यामुळे कलानी यांना महत्त्व प्राप्त झाले. कलानी हे शहर विकासासाठी निधीची मागणी करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या गाडीत बसले होते. अशी माहिती कलानीचे कट्टर समर्थक कमलेश निकम यांनी दिली. 

आमदार आयलानी यांची आमदारकी धोक्यात? माजी आमदार पप्पु कलानी यांनी महायुती मधील शिंदे गटात प्रवेश केल्यास, ते उल्हासनगर विधानसभेवर दावा ठोकणार आहेत. कलानी यांच्या प्रवेशामुळे आयलानी यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीतील नेत्यांना लोकसभेला कलानी हवे, विधानसभा निवडणुकीला नको. अशी त्यांची भूमिका आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरAjit Pawarअजित पवारShrikant Shindeश्रीकांत शिंदे