शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

दाऊदचा फोन येतो, पण तो कुठेय कळत नाही; इक्बाल कासकरची ठाणे कोर्टात माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 11:47 IST

खंडणीच्या गुन्ह्यामध्ये ठाणे पोलिसांनी अटक केलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्याशी ठाणे न्यायालयाने मंगळवारी संवाद साधला.

ठाणे  - खंडणीच्या गुन्ह्यामध्ये ठाणे पोलिसांनी अटक केलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्याशी ठाणे न्यायालयाने मंगळवारी संवाद साधला. दाऊद इब्राहिम कुठे आहे, अशी विचारणा करून तपासकामी पोलिसांना सहकार्य करण्याचे निर्देश न्यायालयाने इक्बालला दिले. गोराई येथील ३८ एकर जागेच्या वादातून एका बांधकाम व्यावसायिकाकडून इक्बाल कासकरनेदोन कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. ठाणेनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी ३ आॅक्टोबर २०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. २६ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी त्याला मुख्य न्यायदंडाधिकारी रा.वि. ताम्हडेकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.

पोलीस कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ करताना, तपासात पोलिसांना सहकार्य करण्याचे निर्देश न्यायालयाने इक्बालला दिले. पोलीस कोठडीसाठी युक्तिवाद सुरू असताना, तुम्हाला भीती वाटत नाही का, अशी विचारणा न्यायालयाने इक्बाल कासकरला केली. तुमच्या कुटुंबातील सदस्य परदेशात कुठे आहेत, हे तुम्हाला माहीत नाही का, असा प्रश्न न्यायालयाने त्याला केला. त्यावर मला माहीत नाही, असे इक्बालने न्यायालयाला सांगितले. त्यानंतर, दाऊद इब्राहिम कुठे आहे, असे न्यायालयाने त्याला विचारले. त्यावरही मला माहीत नसल्याचे इक्बालने न्यायालयाला सांगितले.

न्यायालय आणि इक्बालमध्ये अनौपचारिक संवाद सुरू असतानाच, इक्बालचे वकील श्याम केसवानी यांनी मध्यस्थी केली. दाऊदइब्राहिमला भारतात परत यायचे होते. त्याने ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी  यांच्या मध्यस्थीने सरकारला तसा प्रस्तावही दिला होता. मात्र, आपणास मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातच ठेवावे, अशी अट त्याने घातली होती. सरकारने त्याची ही अट मान्य केली नाही. इक्बाल कासकर दुबईहून भारतात आल्यानंतर आपण स्वत: त्याला न्यायालयासमोर घेऊन आलो होतो. आपण दाऊद इब्राहिमचा भाऊ आहे, असे त्याने स्वत:हून सांगितल्यानंतर इक्बालची ओळख यंत्रणेला कळली होती, याचे स्मरण अ‍ॅड. केसवानी यांनी न्यायालयालाकरून दिले.दाऊदशी फोनवर बोलणे होतेदाऊद इब्राहिमशी कधी बोलणे होते का, अशी विचारणा न्यायालयाने इक्बाल कासकरला केली. इक्बालने त्यावर होकारार्थी उत्तर दिले. दाऊदशी फोनवर बोलणे होते. मात्र, त्याचा फोन येतो तेव्हा मोबाइलवर नंबर दिसत नाही, असे इक्बालने न्यायालयासमोर सांगितले.वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे आदेशइक्बाल कासकरला मधुमेह असून त्याच्या पायाला जखमही झाली आहे. त्याला योग्य ते वैद्यकीय उपचार पुरवण्याची विनंती अ‍ॅड. केसवानी यांनी यावेळी न्यायालयाला केली. त्यावर इक्बालवर ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्याचे आदेश न्यायालयाने खंडणीविरोधी पथकास दिले.

 

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमCourtन्यायालयIqbal Kaskarइक्बाल कासकर