शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

ठाण्याच्या राजकीय धुळवडीचा कुठे रंग, तर कुठे बेरंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 03:59 IST

ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आलेली यंदाची धुळवड राजकीय रंगात न्हावून निघाली. लोकसभेच्या उमेदवारांसह दिग्गज पुढाऱ्यांसाठी हा रंगोत्सव म्हणजे निवडणूक गणितांची जुळवाजुळव करण्याची नामी संधी होती; पण ही संधी साधणे सर्वांनाच जमले असे नाही.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आलेली यंदाची धुळवड राजकीय रंगात न्हावून निघाली. लोकसभेच्या उमेदवारांसह दिग्गज पुढाऱ्यांसाठी हा रंगोत्सव म्हणजे निवडणूक गणितांची जुळवाजुळव करण्याची नामी संधी होती; पण ही संधी साधणे सर्वांनाच जमले असे नाही. ठाण्यात शिवसेनेने उत्साहात धुळवड साजरी केली; पण युती होऊनही भाजपाच्या नगरसेवकांसह अन्य पदाधिकाऱ्यांनीही त्यापासून सुरक्षित अंतर राखणे पसंत केले. त्यामुळे युतीच्या धुळवडीचा बेरंग झाला. दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीच्या ठाणे मतदारसंघात शिवसेनेशी दोन हात करणाºया राष्ट्रवादी काँग्रेसच्या रंगात मनसे नखशिखांत रंगलेली पहावयास मिळाली.सेनेच्या रंगांची भाजपाला अ‍ॅलर्जीलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एकीकडे ठाण्यात राष्टÑवादी आणि मनसेने होळीचा रंग एकत्रपणे उडवला असताना दुसरीकडे शिवसेनेनेही धूळवड साजरी केली. शिवसेना नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी भाजपाचे आमदार संजय केळकर यांना एकाच रंगात रंगवले. हा केवळ होळीचा रंग आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा एकत्रितपणे गुलाल उधळणार असल्याचा दावा शिंदे आणि केळकर यांनी केला; मात्र यावेळी भाजपाचे इतर पदाधिकाऱ्यांसह नगरसेवक गैरहजर दिसून आले.होळीचा मुहूर्त साधून गुरुवारी सकाळीच शिंदे यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघात किसननगरातील रहिवाशांसह बच्चेकंपनीसोबत धूळवड साजरी केली. त्यानंतर त्यांनी थेट आनंदआश्रम गाठून शिवसैनिकांबरोबर होळीचे रंग उधळले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची युती झाली असली, तरी अनेक मतदारसंघांत शिवसेना आणि भाजपाच्या पदाधिकाºयांमध्ये संभाव्य उमेदवारांवरून खटके उडत आहेत. ठाण्यातही भाजपाच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून विचारेंऐवजी दुसरा कोणताही उमेदवार द्यावा, अशी मागणी करून प्रचाराला विरोध केला आहे.या पार्श्वभूमीवर धुळवडीनिमित्ताने एकनाथ शिंदे आणि राजन विचारे यांनी भाजपाचे ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांना युतीच्या रंगात रंगवून टाकले. परंतु, यावेळी भाजपाचे इतर पदाधिकारी मात्र गैरहजर राहिल्याने अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. परंतु, दोन्ही पक्षांनी या मुद्यावर आपली बाजू स्पष्ट केली. काहीही झाले तरी, लोकसभा निवडणुकीत युतीच गुलाल उधळेल, असा ठाम विश्वास या दोघांनीही या पार्श्वभूमीवर व्यक्त केला.आम्ही नैसर्गिक रंगांची उधळण करत आहोत. शिवसेना आणि भाजपाची मैत्री ही मागील कित्येक वर्षांपासूनची आहे. ती आजही कायम आहे. त्यामुळे भाजपाचे सर्वच पदाधिकारी हे आमच्यासोबत असून आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. लोकसभा निवडणुकीत युतीच गुलाल उधळेल.- एकनाथ शिंदे, पालकमंत्रीयुतीच्या वतीने रंग उधळण्यास सुरुवात झाली आहे. २३ मे रोजीसुद्धा युतीच गुलाल उधळेल. राष्टÑवादी, काँग्रेस किंवा मनसे असे कोणीही एकत्र आले, तरी आम्हाला काहीच फरक पडणार नाही. ठाण्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नसून येत्या काळात विजयाचे एकच लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून सर्वजण काम करतील.- संजय केळकर, आमदार, भाजपा, ठाणेराष्टÑवादी-मनसेची एकरंगी धूळवडठाणे : बुरा ना मानो होली है, म्हणत ठाण्यात मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी एकमेकांना रंग लावून निवडणुकीत आपला एकच रंग असल्याचे संकेत दिले. ठाणे लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी एकमेकांना रंग लावून २३ मे रोजी एकत्रच गुलाल उधळू, असे जाहीर केले. त्यामुळे ठाण्यात मनसेचा राष्ट्रवादीला पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले असून शिवसेनेला ही निवडणूक आता फारशी सोपी जाणार नसल्याचे अंदाज व्यक्त होत आहेत.यंदाचे वर्ष हे निवडणुकीचे असल्याने यावेळी होळीला राजकीय रंग चढला होता. राज ठाकरे यांनी आपला पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार नसून, भाजपाविरोधात प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर ठाण्यात धुळवडीनिमित्ताने राष्ट्रवादी आणि मनसे एकाच रंगात भिजताना दिसले. परांजपे यांच्या कार्यकर्त्यांनी मनसेचे जाधव यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी परांजपे आणि जाधव या एकमेकांना एकाच प्रकारचा रंग लावून आपला एकच रंग असल्याचे जाहीर केले.या मतदारसंघ शिवसेनेकडून विद्यमान खासदार राजन विचारे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. तर, राष्ट्रवादीने शहराध्यक्ष आनंद परांजपे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे ठाणे लोकसभेसाठी राजन विचारे आणि आनंद परांजपे यांच्यामध्ये थेट लढत होणार असून, मनसेचा राष्ट्रवादी काँग्रेसला मजबूत पाठिंबा मिळाल्यास शिवसेनेच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसत आहे.होळीच्या सर्वांना शुभेच्छा देताना मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनादेखील शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही. मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी रंगपंचमी साजरी केली असून २३ मे रोजी आम्ही गुलाल उधळू, याची आम्हाला खात्री आहे.- आनंद परांजपे, अध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस, ठाणेआमचा रंग हा एकच रंग आहे. देशात जे सुरू आहे, त्यापेक्षा आम्ही चांगले रंग उधळायला सुरु वात केली असून २३ मे रोजी उडणारा रंग चांगल्या पर्यायाची नांदी असेल, असा माझा विश्वास आहे.- अविनाश जाधव,जिल्हाध्यक्ष, मनसे

टॅग्स :thaneठाणेHoliहोळी