शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यास दौरे काढून नेत्यांची जनतेच्या पैशांवरील मौजमजा कधी थांबणार?, नागरिकांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 13:50 IST

अभ्यास दौऱ्यातून आजपर्यंत शहर व नागरिकांच्या हिताचे काय साध्य झाले, याचा लेखाजोखा लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी दिला पाहिजे.

धीरज परब मीरा राेड :

महापालिकेचे नगरसेवक हे विश्वस्त असतात. नागरिकांनी विश्वासाने त्यांना निवडून दिले असते. मात्र नगरसेवकांकडूनच जनतेचा विश्वासघात होत आहे. मीरा-भाईंदर महापालिकेतील नगरसेवक आणि काही अधिकारी पालिका ओरबाडून खात आहेत. त्यांच्या अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली पर्यटन सुरू आहे. लाखो रुपयांची उधळपट्टी नगरसेवक-अधिकारी करतात, त्यांनी करदात्यांच्या पैशाची आपण उधळपट्टी करीत असल्याचे भान ठेवले पाहिजे. शहराच्या विकासासाठी दिलेला हा निधी मौजमजा करायला नाही. 

मीरा-भाईंदर महापालिका कर्जाच्या ओझ्याखाली दबली आहे. कायम व कंत्राटी कामगारांमुळे आस्थापनेचा खर्च प्रचंड वाढला आहे. पदाधिकारी-अधिकारी यांची आलिशान दालने व आदरातिथ्य, अनावश्यक व मनमानीपणे काढली जाणारी कंत्राटे आदींवर कोट्यवधींचा खर्च सुरू आहे. नागरिकांना मालमत्ता करात सवलत देण्याची मागणी झाली की हेच अधिकारी व नगरसेवक पालिकेकडे पैसे नाहीत म्हणून हात आखडता घेतात.  

वृक्ष प्राधिकरण समितीच्या मेघालय दौऱ्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. याआधी नगरसेवक-अधिकाऱ्यांनी अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली काश्मीर, हिमाचल, नैनिताल, केरळ, कुर्ग, राजस्थान, गोवा, सिक्कीम, म्हैसूर अशा पर्यटनस्थळांना अभ्यासाच्या नावाखाली भेटी दिल्या आहेत. दौऱ्यातील मौजमजेची छायाचित्रे व किस्सेसुद्धा गाजले आहेत. आलिशान हॉटेल, विमान प्रवास, खान-पान व मौजमजा जनतेच्या पैशांवर सुरू आहे. 

अभ्यास दौऱ्यातून आजपर्यंत शहर व नागरिकांच्या हिताचे काय साध्य झाले, याचा लेखाजोखा लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी दिला पाहिजे. दौऱ्याचे प्रत्येक दिवसनिहाय छायाचित्रांसह स्थळ भेटी वा बैठकांचे अहवाल आजपर्यंत सादर झालेले नाहीत. शहरात  झाडे व कांदळवनाची कत्तल केली जात असताना, त्याच्या संरक्षणासाठी ठोस भूमिका न घेणारे नगरसेवक-अधिकारी यांना राज्यातील कृषी केंद्र, रोपवाटिका व प्रकल्पांचा अभ्यास करण्याची गरज वाटत नाही.  हे अभ्यास दौरे म्हणजे जनतेच्या जीवावर चालवलेली चंगळ आहे.

टॅग्स :thaneठाणे