शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

येऊरमधील राजकीय नेते, अधिकाऱ्यांचे २०० अनधिकृत बंगले पाडणार कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 13:11 IST

१९ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या याचिकेत न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या बंगल्यावर कारवाईचे धारिष्ट्य पालिका दाखविणार का, असा सवाल उपस्थित केला आहे. 

ठाणे : ठाणे महापालिकेला येऊरमधील २०० अनधिकृत बांधकामे तत्काळ तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. येथील अनधिकृत बंगल्याची यादी करण्याचे काम सुरू झाले आहे. परंतु, या भागात अनेक राजकीय नेत्यांसह त्यांच्या नातेवाईक आणि महापालिकेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे बंगले आहेत. मुंब्र्यातील सर्वसामान्य, गोरगरिबांच्या इमारतींवर झटपट कारवाई करणे सोपे होते. १९ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या याचिकेत न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या बंगल्यावर कारवाईचे धारिष्ट्य पालिका दाखविणार का, असा सवाल उपस्थित केला आहे. 

मुंब्र्यातील खान कंपाउंडमधील २१ अनधिकृत इमारतींवर कारवाईचे आदेश देऊन उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला पहिला दणका दिला. त्यानंतर याच भागातील आणखी अकरा इमारतींवर कारवाईचा हातोडा पडणार आहे. येऊरमधील २०० अनधिकृत बंगल्यांवर कारवाईचे आदेश न्यायालयाने दिले. यासंदर्भात २००६ साली येऊरमधील याचिकाकर्ते बळीराम जाधव यांनी याचिका दाखल केली होती. २००६ पासून ही याचिका न्यायालयात प्रलंबित होती. याचिकेच्या सुनावणीपूर्वीच जाधव यांचा सहा वर्षांपूर्वी मृत्यू झाला. ही याचिका जेव्हा दाखल केली त्यावेळी ठाणे महापालिकेने न्यायालयात येऊरमध्ये २०० अनधिकृत बांधकामे असल्याचा अहवाल सादर केला होता. यावर मंगळवारी सुनावणी झाली. तेव्हा २०० अनधिकृत बांधकामे तत्काळ पाडण्याचे आदेश दिले. या प्रकरणात केलेल्या कारवाईचा अहवाल सहा महिन्यांत पालिकेला न्यायालयात सादर करावा लागणार आहे.  

शहर विकास विभागाशी संपर्क साधून येथे परवानगी दिलेल्या बंगल्याची यादी मागविण्यात आली. यादी तपासून उर्वरित बंगल्यांवर न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल. शंकर पाटोळे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, ठाणे पालिका.

आजमितीस ४५० हून अधिक बंगलेन्यायालयाने येथील बंगल्यांवरून महापालिकेला फटकारले. आजमितीस येऊरमध्ये ४५० हून अधिक बंगले असल्याचा दावा महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला. येथील बहुतेक परिसर इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये असल्याने या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम करता येत नाही. मात्र, असे असतानाही येथे बंगले बांधले गेले.

महापालिकेने दिली १४२ बंगल्यांना परवानगीयेऊर येथे बंगले बांधण्याकरिता महापालिकेच्या शहर विकास विभागाकडे २८ प्रस्ताव सादर झाले आहेत. येथील १४२ बंगल्यांना पालिकेने परवानगी दिली. सत्तेत असलेल्या एका बड्या राजकीय नेत्याच्या नातेवाइकाच्या बंगल्याचे काम सध्या सुरू आहे. शासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचेही बंगले येथे आहेत. 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणCourtन्यायालयMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद