शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्टमध्ये ८ जण तब्बल अडीच तास अडकतात तेव्हा..; माजी आमदाराच्या हॉटेलमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 06:11 IST

अडीच तासांनी संध्याकाळी सहाच्या सुमारास लिफ्ट तळमजल्यावर आणण्यात यश आले. त्यानंतर अडकलेल्या आठ जणांची सुटका करण्यात आली.

मीरा रोड : काशिमीरा येथील फाऊंटन नाका वरसावे येथील सीएन राॅक या हाॅटेलची लिफ्ट अतिवजनामुळे बंद पडल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. लिफ्टमध्ये अडकलेल्या आठ जणांनी अडीच तास काेंडमारा सहन केल्यानंतर त्यांची सुटका झाली. अग्निशमन दल एरव्ही लिफ्टचे काही भाग कापून अडकलेल्या व्यक्तींची सुटका करते. मात्र, यावेळी लिफ्ट उघडण्यासाठी अडीच तास वाट पाहण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या कंपनीचे हे हॉटेल आहे. येथे खासगी कार्यक्रमासाठी लाेक आले हाेते. या लिफ्टची क्षमता चार माणसांची आहे, मात्र त्यात आठ जण शिरल्यामुळे अतिवजनामुळे ही लिफ्ट तळ आणि पहिल्या मजल्याच्या दरम्यान दुपारी ३:३० च्या सुमारास बंद पडली.

समाजमाध्यमांवर संदेश व्हायरल समाजमाध्यमांवर संदेश व्हायरल झाल्याने काशिमीरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांच्यासह पोलिस पथक तसेच पालिकेच्या अग्निशमन दलाचे डोसन ढोल्या व त्यांचे पथक हॉटेलमध्ये चारच्या सुमारास दाखल झाले. हॉटेल चालकांनी लिफ्टची देखभाल करणाऱ्या तज्ज्ञांनाही पाचारण केले हाेते. लिफ्टचा वरचा भाग व बाहेरचे दार कापून त्यांची तत्काळ सुटका करणे अपेक्षित होते. मात्र, तत्काळ कार्यवाही होत नसल्याची बाब समजल्यावर पालिकेच्या देवदूत रेस्क्यू वाहनाने अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचे जगदीश पाटील, संजय पाटील, राजू मुकादम, लक्ष्मण भंडारी आदींचे आणखी एक पथक घटनास्थळी पाठवले.

अडीच तासांनी संध्याकाळी सहाच्या सुमारास लिफ्ट तळमजल्यावर आणण्यात यश आले. त्यानंतर अडकलेल्या आठ जणांची सुटका करण्यात आली. कार्यक्रमासाठी गर्दी हाेणार हे माहिती असतानाही खबरदारी म्हणून हॉटेलतर्फे लिफ्टमन ठेवणे आवश्यक होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले.