शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चर्चा काहीही असो मी केवळ मुरबाडसाठीच इच्छुक, आमदार किसन कथोरे स्पष्टच बोलले

By पंकज पाटील | Updated: September 8, 2023 18:57 IST

आमदार किसन कथोरे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत आपण केवळ मुरबाड विधानसभेमध्ये निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट केले आहे.

बदलापूर : मुरबाड विधानसभा क्षेत्राचे आमदार किसन कथोरे हे कल्याण किंवा भिवंडी या दोन्हीपैकी एका मतदार संघात निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा सुरू होती. मात्र आमदार किसन कथोरे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत आपण केवळ मुरबाड विधानसभेमध्ये निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट केले आहे.

मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांचा कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभा या दोन्ही क्षेत्रांमध्ये चांगला संपर्क असल्यामुळे त्यांना उद्धव ठाकरे गटातर्फे उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र आज कथोरे यांनी पत्रकार परिषद घेत भिवंडी काय किंवा कल्याण काय या दोन्ही मतदारसंघात आपल्याला लोकसभा निवडणूक लढवण्यात रस नसल्याचे स्पष्ट केले. 

गेल्या वीस वर्षापासून आपल्याला आमदार म्हणून आपल्या मतदारांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे विकासाच्या माध्यमातून त्यांची सेवा करण्यातच आपण धन्यता मानत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्ष संघटनेवर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता कधी इच्छुक असल्याची बाब पुढे करीत नाही. पक्ष जो निर्णय देतो तो मान्य करून अखंडितपणे आणि अविरतपणे काम करण्याचे प्रयत्न करीत असतो. 

आपण देखील पक्ष संघटनेसाठीच समर्पित असून आपल्याला लोकसभा निवडणुकीत रस नसल्याचे स्पष्ट केले. मुरबाड मतदार संघामध्ये विकासाच्या माध्यमातून जो बदल करण्यात आला आहे तो बदल कायम ठेवण्याचा आणि भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व कायम राखण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या आठवड्याभरापासून मी कामानिमित्त परराज्यात असताना मुद्दाम काही खोट्या बातम्या पेरल्या गेल्याची बाब आपल्या निदर्शनास आली आहे. आपल्याविषयी दुसऱ्या पक्षांमध्ये काय चर्चा चालली आहे, याच्याशी मला देणे घेणे नसून मी माझ्या पक्षाशी प्रामाणिक आहे,एवढेच मला कळतं अशीच ठाम भूमिका कथोरे यांनी व्यक्त केली. 

आमदार आणि खासदार यांच्यातील वादाबाबत विचारणा केली असता या सर्व प्रकरणाची माहिती आपण वरिष्ठांना दिली असून वरिष्ठ त्या संदर्भात निर्णय घेतील. त्यामुळे आम्ही स्थानिक पातळीवर नागरिकांची कामे करण्यावर भर देत आहोत. 'माणसांना कापतो' अशा आशयाचे जे व्हिडिओ व्हायरल केले आहेत ती आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी होते. मात्र सुज्ञ नागरिकांना आपल्या स्वभावाचे आणि कामाच्या शैलीची जाण आहे 

टॅग्स :badlapurबदलापूरBJPभाजपाPoliticsराजकारण