शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

काय हवे? रोजगार, शुद्ध पाणी, उच्चशिक्षण अन् पुरेसे रेशन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 05:19 IST

नारायण जाधव/अनिरुद्ध पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांसह राज्यातील सर्व १३ आदिवासी जिल्ह्यांत ...

नारायण जाधव/अनिरुद्ध पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांसह राज्यातील सर्व १३ आदिवासी जिल्ह्यांत वाढत्या कुपोषणाचे मूळ हे त्या आदिवासी पट्ट्यातील मागासलेपणाबरोबरच पोटातील भुकेसह बेरोजगारी आणि पिण्यास पुरेसे स्वच्छ पाणी नसणे, अपुऱ्या आरोग्य सुविधांमध्ये आहे. ‘लोकमत’च्या पाहणीत हे वास्तव आढळले आहे.मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर आणि वसई-विरार या शहरी भागांसह जिल्ह्यातील सर्वच औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा करणारी १० धरणे ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत आहेत. विशेषत: आदिवासीबहुल डोंगरदऱ्यांतील दुर्गम भागात ती आहेत; परंतु महानगरांतील सव्वातीन कोटी जनतेची तहान भागवण्यासाठी आपली प्राणप्रिय जमीन देऊनही येथील ग्रामीण जनता तहानलेलीच आहे. ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशी त्यांची अवस्था आहे. धरणे जवळ असूनही ठाण्यातील मुरबाड, शहापूर या दोन तालुक्यांसह पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा हे तालुके तहानलेलेच आहेत. धरणांतील पाणी मिळत नसल्याने येथील आदिवासी विहिरी, झरे, डोंगरदºयांतील ओहळ, नद्यांतील डबकी यांचे पाणी पितात. काही पाडे आणि गावांत हापसे आहेत. मात्र, सर्व पाणीस्रोत कमालीचे प्रदूषित आणि क्षारयुक्त आहेत. यामुळे आदिवासी भागात अ‍ॅनिमियासह डायरियाचे प्रमाण वाढले आहे.पावसाळी शेती वगळता रोजगाराची कोणतीही सुविधा दोन्ही जिल्ह्यांतील आदिवासी पाड्यांत नाही. रोजगार हमी योजना अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना म्हणजे काय रे भाऊ, असा प्रश्न काही भागातील आदिवासी विचारतात. ज्या भागात ही योजना राबविली जाते, तेथील आदिवासी मजुरांना वेळेत पैसे मिळत नाहीत. यामुळे ते ठाणे, नाशिक, पुणे, अहमदनगर जिल्ह्यांसह नजीकच्या गुजरात राज्यात स्थलांतर करतात. यामुळे त्यांच्या आरोग्याची आबाळ तर होतेच.सोबत बालकांनाही फटका बसतो. शासनासह सामाजिक संस्थांनी जर त्यांना रोजगार दिला, तर स्थलांतर थांबून कुपोषणावर मात करता येऊ शकते. पावसाळी शेती असल्याने आदिवासी वर्षांच्या इतर दिवसांत पोटाची खळगी भरण्यासाठी इतरत्र स्थलांतर करतात. दुसºया गावात, शहरांत गेल्याने एरवी रेशनवर मिळणारे अन्नधान्यासही ते मुकतात. यामुळे त्यांची भुकेची आग पाहिजे तेवढी शमत नाही. यूपीए सरकारने सुरू केलेल्या राष्ट्रीय बाल आरोग्य अभियानासाठी जिल्हास्तरावरील अंमलबजावणीसाठी एक पुरु ष आणि एक महिला, असे दोन वैद्यकीय अधिकारी, एक औषधनिर्माता, परिचारिका, अशी टीम तयार करण्यात आली आहे.प्रत्येक तालुक्यासाठी तीन स्वतंत्र पथके नेमण्यात आली होती. महाराष्ट्रासाठी १,१३० स्वतंत्र तपासणी पथकांची नेमणूक केली. त्यातील ठाण्याच्या वाट्याला ३९ पथके आली़ मात्र, ज्या पालघर तालुक्यातून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला, त्या पालघरसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी या योजनेची चांगली अंमलबजावणी झाली आहे, तर काही ठिकाणी बोजवारा उडाला आहे. मानधन तुटपुंजे असल्याने तज्ज्ञ डॉक्टर येथे यायला तयार नाहीत. ते दिले तर आदिवासींचे जीवन निरोगी राहण्यास मदत होईल.अंत्योदय लागू कशासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने राज्यांतील सर्वच आदिवासी कुटुंबांना अंत्योदय योजनेंतर्गत मिळणारे ३५ किलो धान्य द्यायला हवे. आदिवासींना अंत्योदय योजना लागू केली, तर त्यांची भूक आपोआप भागेल. शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने राज्यांतील सर्वच आदिवासी कुटुंबांना अंत्योदय योजनेंतर्गत मिळणारे ३५ किलो धान्य द्यायला हवे. आदिवासींना अंत्योदय योजना लागू केली, तर त्यांची भूक आपोआप भागेल.रिक्त पदेकधी भरणार?ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडेही सुमारे दहा वर्षांपासून सहायक आरोग्य अधिकारी, तर चार वर्षांपासून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, क्षयरोग अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाºयांची दहा पदे रिक्त आहेत. कुपोषण निर्मूलनासाठी ही रिक्त पदे भरण्याची गरज आहे.