शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

रेल्वे स्थानकातून फेरीवाले हटले पण अवैध पार्क होणा-या दुचाकींचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 18:49 IST

रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांना बंदी केलेली असतांनाच अवैधपणे पार्क केलेल्या दुचाकींमुळेही नागरिक हैराण झाले आहेत. विशेषत: कोपर आणि ठाकुर्ली स्थानकातील प्रवाशांना या अवैध पार्किंगचा त्रास होत आहे.

- अनिकेत घमंडीडोंबिवली: रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांना बंदी केलेली असतांनाच अवैधपणे पार्क केलेल्या दुचाकींमुळेही नागरिक हैराण झाले आहेत. विशेषत: कोपर आणि ठाकुर्ली स्थानकातील प्रवाशांना या अवैध पार्किंगचा त्रास होत आहे. त्यासंदर्भात प्रवाशांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे तक्रार दिली, त्या लोकप्रतिनिधींनीही ठिकठिकाणच्या स्थानक प्रबंधकांशी त्यासंदर्भात पत्रव्यवहार केला पण ती समस्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे.कोपर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला पादचारी पूलालगत दुषचाक्या पार्क केल्या जातात. मुंबईसह विविध भागांमध्ये जाणारे चाकरमानी त्या ठिकाणी दुचाक्या लावतात, तसेच ठाकुर्लीतही स्थानक परिसरात दुचाकी लावण्यात येतात. सकाळी पार्क झालेली वाहने संध्याकाळी साडेसातनंतर तर काही गाड्या मध्यरात्री काढण्यात येतात. त्यामुळे या अवैध गाडयांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. गाड्या अवैधपणे पादचारी पुलाच्या दुतर्फा पार्क करण्यात येत असल्याने त्याचा त्रास जा-ये करणा-या प्रवाशांना होतो. सकाळी घाईगर्दीच्या वेळेत ती अडचण आणखी वाढते. त्यामुळे नेमके कोणाकडे दाद मागायची असा सवाल प्रवाशांना पडतो. ठाकुर्ली आणि कोपर या दोन्ही स्थानकात पूर्णवेळ स्थानक प्रबंधक बसत नाहीत. त्याचा फायदा घेत गाड्या पार्क करण्यात येत असल्याची टिका स्थानिकांनी केली. रेल्वे प्रशासनाने ठाणे, डोंबिवली, कल्याण यांसह अन्य स्थानकांच्या बाहेर वाहनतळाची सोय केली आहे. तशी सुविधा या ठिकाणीही करावी, जेणेकरुन प्रवाशांना त्याचा त्रास होणार नाही अशी अपेक्षा म्हात्रेनगरचे रहिवासी अमित कासार यांनी केली.कोपर स्थानकातील सहाय्यक स्थानक प्रबंधकांसह डोंबिवलीचे तत्कालीन स्थानक प्रबंधक ओमप्रकाश करोटीया यांना वेळोवेळी पत्र देंण्यात आली आहेत, मात्र त्याचा काहीही फरक पडला नाही. आता रेल्वेच्या वरिष्ठांशी संपर्क करावा लागेल - मुकुंद पेडणेकर, नगरसेवकरेल्वेने दुचाकी गाड्यांसाठी वाहनतळ बनवावे, त्यासाठी योग्य तो दर आकारावा. पार्किंग धोरण बनवावे, जेणेकरुन गाड्या लावतांना शिस्त लागेल. पण तसे होत नाही. त्याचा त्रास नागरिकांना का असावा? - सुलिन मिश्रा, ठाकुर्ली 

टॅग्स :thaneठाणे