शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सरनाईकांच्या पारड्यात अजितदादांचे वजन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 00:45 IST

एकनाथ शिंदे यांचा रवींद्र फाटकांकरिता आग्रह : जितेंद्र आव्हाडांना थोरल्या पवारांचा आधार

ठाणे : राज्यातील महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात ठाण्यातून कुणाकुणाची वर्णी लागणार, याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. तीन पक्षांचे सरकार असल्याने मोजकीच मंत्रीपदे वाट्याला येणार असल्याने मंत्रिमंडळात समावेशाकरिता स्वपक्षाबरोबर मित्रपक्षाच्या माध्यमातूनही लॉबिंग सुरू असल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा, याकरिता अजित पवार हेच आग्रही असल्याची चर्चा आहे, तर एकनाथ शिंदे हे रवींद्र फाटक यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश व्हावा, याकरिता प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराकरिता आता ३० डिसेंबरचा मुहूर्त अंतिम करण्यात आल्याची माहिती आहे. विद्यमान मंत्र्यांपैकी काहींनी माध्यमांना तशी माहिती दिली आहे. ठाण्यातील सरनाईक यांना मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून स्थान मिळावे म्हणून अजित पवार यांनी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शब्द टाकल्याचे बोलले जात आहे. मात्र, एकनाथ शिंदे हे आपल्या मर्जीतील रवींद्र फाटक यांच्या गळ्यात राज्यमंत्रीपदाची माळ पडावी, याकरिता प्रयत्नशील असल्याचे समजते.

शिवसेनेत राज्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असताना सलग तीनवेळा निवडून आलेले राष्टÑवादीचे मुंब्रा-कळव्याचे आ. जितेंद्र आव्हाड यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार किंवा कसे, याबाबतही तर्कवितर्क केले जात आहेत. अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर, ठाण्यात आव्हाड समर्थकांनी अजितदादांविरोधात आंदोलन केले होते. ही बाब अजितदादा यांना रुचलेली नाही. त्यामुळे आव्हाड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाच्या मार्गात तेच खोडा घालण्याची शक्यता काही दादासमर्थक व्यक्त करीत आहेत, तर आव्हाड यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास किंवा अल्पसंख्याक कल्याण विभागाचा कार्यभार सोपवला जाईल, अशी त्यांच्या समर्थकांची अपेक्षा आहे.

शरद पवार यांच्या संघर्षाच्या काळात आव्हाडांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाला सावरण्याचे काम केले आहे. शरद पवार यांचे ते खंदे समर्थक आहेत. धाकटे पवार जरी आव्हाडांवर नाराज असले, तरी पक्षात अंतिम शब्द थोरल्या पवार यांचाच चालतो, हे गेल्या काही महिन्यांत अनेक घटनांतून स्पष्ट झाले आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत अजित पवार यांचा समावेश झाला नाही, याकडे लक्ष वेधले जात आहे. त्यामुळे शरद पवार हे अजितदादांची समजूत काढतील व आव्हाड यांना चांगले खाते सुपूर्द करतील, अशी त्यांच्या समर्थकांची अपेक्षा आहे.सरनाईक यांनी दिला होता मोबाइल भेटसरनाईक हे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी सिद्धिविनायक मंदिरात दानपेटीतील एका भक्ताने दान दिलेला व्हर्टू कंपनीचा महागडा मोबाइल त्यांनी लिलावात घेऊन अजित पवार यांना भेट दिला होता. मीडियात या प्रकरणाची चर्चा झाल्यावर पवार यांनी तो मोबाइल परत केला होता.

टॅग्स :thaneठाणेAjit Pawarअजित पवारpratap sarnaikप्रताप सरनाईक