शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसोहळ्यासाठी आता वेडिंग मास्क, वधूसाठी खास नथीचा मास्क, पेहरावानुसार डिझाइन   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 07:12 IST

Coronavirus News : मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन जाहीर झाले आणि मार्च, एप्रिल, मे महिन्यात ठरलेली लग्ने रद्द झाली. अनलॉक १ सुरू झाल्यावर काहींनी घरच्या घरी लग्न उरकून घेतले. डिसेंबरमध्ये लग्नाचे मुहूर्त असल्याने अनेकांनी याच महिन्याचा मुहूर्त साधला आहे.  

ठाणे -  कोरोनामुळे वधू-वरासाहित येणाऱ्या पाहुणे मंडळींनाही मास्क घालणे अनिवार्य आहे. त्यामुळे आता लग्नसराईसाठी फॅशनेबल मास्क बाजारात आले आहेत. वधूसाठी खास नथीचा मास्क तयार केला आहे.मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन जाहीर झाले आणि मार्च, एप्रिल, मे महिन्यात ठरलेली लग्ने रद्द झाली. अनलॉक १ सुरू झाल्यावर काहींनी घरच्या घरी लग्न उरकून घेतले. डिसेंबरमध्ये लग्नाचे मुहूर्त असल्याने  अनेकांनी याच महिन्याचा मुहूर्त साधला आहे.  फॅशन डिझायनर शिल्पा चव्हाण यांनी आपल्या कल्पकतेतून  ते तयार केले आहेत. वधूला नटविताना नथ हा महत्त्वाचा दागिना तिला घातला जातो. नथीशिवाय चेहरा खुलून दिसत नाही. मास्क घालणे अनिवार्य असल्याने मास्कमध्ये नथ दिसून येणार नाही म्हणून त्यांनी मास्कलाच नथ लावली आहे. त्यात बंगाली, महाराष्ट्रीय, पंजाबी, राजस्थानी समाजातील सोहळ्यानुसार नथीचे मास्क तयार केले आहेत. या मास्कची किंमत २०० रुपयांपासून पुढे आहे. वरासाठी सोनेरी रंगाची लेस लावून सजावटीचे मास्क असून याची किंमत १५० रुपयांपासून पुढे आहे. हे मास्क वधू-वराच्या पेहरावानुसार त्या त्या रंगांचे तयार केले जातात. रिसेप्शन सोहळा असेल तर त्या कपड्यांनुसारही मास्क तयार करून दिले जात आहेत. 

वधूचा मास्क हा जरीचा तयार केला आहे.  गरम होऊ नये व श्वास घेण्यास अडथळा येऊ नये म्हणून आतून कॉटन वापरले आहे.              - शिल्पा चव्हाण 

पाहुण्यांसाठीही वेडिंग मास्कवधू-वराच्या बाजूने येणाऱ्या पाहुण्यांना वेगवेगळ्या रंगांचे मास्क आहेत जेणेकरून दोन्ही बाजूचे पाहुणे ओळखता येतील, असे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणेmarriageलग्न