शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रसाठा २० वर्षांपासून आरोपींच्या ताब्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 05:55 IST

दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या हस्तकाकडून ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी हस्तगत केलेला शस्त्रसाठा किमान २० वर्षांपासून आरोपींच्या ताब्यात होता. या शस्त्रांचा वापर यापूर्वी झाला का किंवा भविष्यात त्याचा वापर कुणाला संपवण्यासाठी केला जाणार होता, या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना आता शोधायची आहेत.

- राजू ओढेठाणे -  दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या हस्तकाकडून ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी हस्तगत केलेला शस्त्रसाठा किमान २० वर्षांपासून आरोपींच्या ताब्यात होता. या शस्त्रांचा वापर यापूर्वी झाला का किंवा भविष्यात त्याचा वापर कुणाला संपवण्यासाठी केला जाणार होता, या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना आता शोधायची आहेत.मुंबईतील गोरेगाव येथील क्रांती चाळीतून ठाणे पोलिसांनी शुक्रवारी एके-५६ रायफल, तीन मॅगझिन्स, १०८ जिवंत काडतुसे आणि दोन पिस्टल हस्तगत केली. दाऊदचा एकेकाळचा हस्तक इक्बाल अत्तरवाला याच्या खुनाचा कट रचल्याप्रकरणी ठाणे कारागृहात बंदिस्त असलेल्या नईम खानच्या घरातून हा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला.नईम खानला मुंबई पोलिसांनी २०१६ मध्ये अटक केली होती. त्यावेळी आपल्या घरातील एके-५६ पोलीस जप्त करतील, या भीतीने त्याने सर्व शस्त्रे सध्या अमली पदार्थ तस्करीच्या आरोपामध्ये ठाणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या नागपाडा येथील जाहीद अली शौकत काश्मिरी याच्याकडे दिली होती. त्याने जवळपास दोन वर्षे ही शस्त्रे सांभाळली. तीन महिन्यांपूर्वी ही शस्त्रे नईमच्या घरी पोहोचवण्याचा निरोप जाहीदला मिळाला. तेव्हापासून हा शस्त्रसाठा नईमच्या घरात होता.पोलिसांनी नईमच्या घरातील एका पलंगातून हा शस्त्रसाठा हस्तगत केला. चिनी बनावटीची एके-५६ ही १९९७ सालच्या वृत्तपत्रामध्ये गुंडाळलेली होती. त्यावरून ही रायफल १९९७ च्या आधीपासून नईमकडे असावी, असा कयास पोलिसांनी व्यक्त केला. ठाणे पोलिसांच्या या धाडसी कारवाईने अनेक प्रश्नांना जन्म घातला आहे. नईमच्या चौकशीतून भविष्यात या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे.दुसरी मोठी कारवाईशस्त्रसाठा जप्तीची ठाणे पोलिसांनी केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. नोव्हेंबर २००० मध्ये ठाणे पोलिसांनी दिवंगत सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हत्येचा कट उधळवून लावला होता. त्या वेळी पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांचा समावेश असलेल्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने लष्कर-ए-तोयबाच्या चार अतिरेक्यांना अटक करून एके-४७ सह मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला होता. त्यानंतर, आता ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली.दीपालीची झाली यास्मिननईम खानची पत्नी यास्मिन हिला पोलिसांनी अटक केली आहे. ती हिंदू असून तिचे खरे नाव दीपाली सुर्वे आहे. ती नईमच्या घराजवळच राहायची. तिने नईमसोबत प्रेमविवाह केला होता. तिचे वडील वारले असून भाऊ सुरत येथे हिरे उद्योगाशी संबंधित कामकाज करतो. नईमशी विवाह झाल्यानंतर दीपालीचे नाव बदलून यास्मिन ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिला एक मुलगा आणि एक मुलगी असून दोघेही अल्पवयीन आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाthaneठाणे