शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
3
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
4
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
5
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
6
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
7
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
8
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
9
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
10
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
11
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
12
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
13
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
14
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
15
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
16
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
17
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
18
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
19
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
20
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन महालक्ष्मी : मृत्यूच्या दाढेतूनच झाली आमची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 00:20 IST

ऑपरेशन महालक्ष्मी : संदीप भाटलेकरने कथन केला थरार

निलेश धोपेश्वरकर

ठाणे : २६ जुलै ही तारीख मुंबईकर कधीही विसरू शकणार नाही. त्यावेळच्या आठवणी आजही मुंबईतील नागरिकांच्या मनात घर करून आहेत. याचीच पुनरावृत्ती २६ जुलैला मुंबईहून कोल्हापूरला जाणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांबाबतीत झाली. वरून धोधो कोसळणारा पाऊस आणि गाडीबाहेर डोकावले, तर नजर जाईल तिथपर्यंत केवळ पाणीच दिसत होते. रेल्वेमार्गावर पाणी साचल्याने गाडी हलण्याचे नाव घेत नव्हती. त्यामुळे पाऊस थांबला नाही, तर आपले काही खरे नाही, अशी भावना प्रत्येक प्रवाशाच्या मनात आली आणि मग सुरू झाला देवाचा धावा. केवळ नशीब बलवत्तर म्हणून आमची मृत्यूच्या दाढेतून सुटका झाली, अशा शब्दांत संदीप भाटलेकर या डहाणूच्या प्रवाशाने शनिवारच्या रात्रीचा थरार ‘लोकमत’शी बोलताना मांडला.

डहाणू येथे राहणारे भाटलेकर कोल्हापूर येथे एका कार्यक्रमासाठी जाण्याकरिता महालक्ष्मीच्या वातानुकूलित डब्यातून प्रवास करत होते. गाडी सीएसटीएम येथून सुटली, तेव्हा फारसा पाऊस नव्हता. कल्याण सोडले आणि पावसाचा जोर अधिक जाणवत होता, असे ते म्हणाले. अंबरनाथ, बदलापूर परिसरांत तुफान पाऊस सुरू होता. त्यामुळे आमची गाडी अंबरनाथ स्थानकाच्या अलीकडे दोन ते अडीच तास थांबली होती. पावसामुळे रेल्वेमार्गावर पाणी साचले असेल. ओसरले की गाडी सुटेल, असा प्रवाशांचा समज झाला. रात्रही झाली असल्याने प्रवासी झोपले होते.भाटलेकर म्हणाले, साधारण २ च्या सुमारास गाडी सुरू झाली. मी तोपर्यंत जागा होतो. त्यानंतर झोप लागली. गाडीने बदलापूर स्थानक सोडल्यावर ती थांबली. एसी डबा असल्याने बाहेर काय परिस्थिती होती, याचा अंदाजही येत नव्हता. पण, नंतर एसी बंद झाले. पंखे सुरू होते. मला पहाटे साडेपाचच्या सुमारास कोल्हापूरहून मित्राचा फोन आला, तेव्हा आपण कर्जतही पार केले नाही, हे लक्षात आले, आणि डोळ्यांवरची झोप खाडकन उडाली.चार किमी डोंगर उतरेपर्यंत जीवात जीव नव्हताशनिवारी सकाळी ८ च्या दरम्यान पाऊस कमी झाला. एनडीआरएफचे पथक आल्यावर जीवात जीव आला. तोपर्यंत हेलिकॉप्टरही येऊन परिस्थितीची पाहणी करत होते. एनडीआरएफच्या जवानांनी सांगितलेकी, चालत जाण्यासाठी पुरुष प्रवाशांसाठी गाडीपासून समोरील एका हॉटेलपर्यंत दोरी बांधली आहे. त्याला धरून जा, आमचे जवान, स्थानिक नागरिक मदतीसाठी आहेत. साधारण छातीभर पाण्यातून सामान घेतदोरीच्या मदतीने आम्ही चालू लागलो. डोंगर उतरून चामटोली गावात उतरल्यावर, तेथे अधिकारी, पोलीस, एनडीआरएफचे जवान होते. त्यांनी आमच्याकडील बॅगा घेतल्या. यावेळी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात मदत केली.गाडी पुढे का सोडली?: मुसळधार पाऊस पडत होता, तर गाडी अंबरनाथच्या पुढे का नेली? अंबरनाथ किंवा बदलापूर स्थानकात ही गाडी थांबवली असती, तर ही परिस्थिती ओढवली नसती, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे