शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुरेशा ऊर्जेसाठी अणुऊर्जेशिवाय आपल्यासमोर अन्य पर्याय नाही: डॉ. अनिल काकोडकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 12:49 IST

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : देशाची वाढती ऊर्जेची गरज भागविण्यासाठी सौरऊर्जा, पवन ऊर्जा आदी अपारंपरिक स्रोतांचा वापर करीत आहोत, परंतु विकास प्रक्रियेत अपरिहार्य असणारी पुरेशी ऊर्जा मिळविण्यासाठी अणुऊर्जेशिवाय आपल्यासमोर अन्य पर्याय नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी मंगळवारी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या ७६व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी गडकरी रंगायतन येथे विचारमंथन व्याख्यानमालेंतर्गत काकोडकर यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. ते म्हणाले की, क्रमिक अभ्यासक्रमापेक्षा अधिक सखोल आणि सुलभपणे विज्ञान समजून घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विज्ञान केंद्राची आवश्यकता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण होईल. अधिक संख्येने विद्यार्थी विज्ञान शाखेकडे वळतील. तसे विज्ञान केंद्र ठाण्यातही उभे राहणार असून त्यासाठी ठाणे महापालिकेने पुढाकार घेतला आहे. मराठी विज्ञान परिषदेलाही महापालिकेने त्या प्रकल्पात सहभागी करून घेतले आहे. हे विज्ञान केंद्र विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे ठरेल, असे प्रतिपादन त्यांनी केले. मुलाखतीमध्ये डॉ. काकोडकर यांनी त्यांच्या बालपणापासूनचा प्रवास सांगितला. 

सन १९७४ आणि १९९८ मध्ये भारताने केलेल्या अणुचाचण्या, जगभरात उमटलेले त्याचे पडसाद, देशाचे संरक्षण आणि विकासासाठी अणुऊर्जेचा झालेला उपयोग याबद्दलचे विवेचनही डॉ. काकोडकर यांनी केले. तसेच, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या उपयोगातून साध्य होणाऱ्या गोष्टींचाही ऊहापोह केला. आधुनिक तंत्रज्ञानातून निर्माण होणाऱ्या रोजगार आणि व्यवसायांच्या संधी ग्रामीण भागातील रहिवाशांना उपलब्ध करून दिल्या तर देशाचा सर्वांगीण विकास होऊन महासत्ता होण्याचे आपले स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास डॉ. काकोडकर यांनी यावेळी व्यक्त केला. ग्रामीण भागातील जनतेला आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतमाल प्रक्रिया आणि अन्य व्यवसाय उपलब्ध झाले तर तिथून शहरात होणारे स्थलांतर थांबेल आणि पर्यायाने शहरांचे बकालीकरण कमी होईल. 

विज्ञानमंचच्या बोधचिन्हाचे अनावरण काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार समीर कर्वे यांनी त्यांची मुलाखत घेतली. डॉ. काकोडकर यांच्या पत्नी सुयशा काकोडकर, मराठी विज्ञान परिषदेच्या ठाणे विभागाचे अध्यक्ष दा. कृ. सोमण हे उपस्थित होते.

दरडोई उत्पन्न वाढून त्यांचे जीवनमान सुधारेल

ग्रामीण भागातील कुटुंबांचे दरडोई उत्पन्न त्यामुळे वाढून त्यांचे जीवनमान सुधारेल,’ ही ‘सिलेज’ची (सिटी इन टु व्हिलेज) कल्पना डॉ. काकोडकर यांनी स्पष्ट केली. भारत अग्रेसर देश म्हणून पुढे जायचा असेल तर तंत्रज्ञान निर्मितीची क्षमता मर्यादित न राहता जे इतर देशांनी नाही केले ते भारताने करावे. जगाच्या पुढे, पण जगाच्या दृष्टीने महत्त्वाचे तंत्रज्ञान विकसित केले तर भारत अग्रेसर देश होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मुलाखतीच्या उत्तरार्धात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.

 

टॅग्स :thaneठाणे